जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
निकालाच्या अनेक डेडलाईन उलटून गेल्या तरी मुंबई विद्यापीठाचे तारीख पे तारीख सुरुच आहे.
मुंबई विद्यापाठाच्या निकालासाठी आता 19 सप्टेंबरची नवी डेडलाईन देण्यात आली आहे.
बकरी ईद आणि गणेशोत्सवामुळे निकाल लांबल्याचा अजब दावा मुंबई विद्यापिठाने केला आहे.
विद्यापीठाच्या दिरंगाईमुळे विद्यार्थ्यांचं नाहक नुकसान होत आहे.
यापुर्वी मुंबई विद्यापिठाने मुंबईत पडलेला पडलेला तुफान पाऊस आणि गणेशोत्सवामुळे आपण घेतलेल्या परीक्षांचे पूर्ण निकाल लावता आले नाहीत असा अजब दावा
मुंबई विद्यापीठानं मुंबई हायकोर्टात केला होता .
विद्यापीठाने जवळपास सहाव्यांदा डेडलाईन बदलत 6 सप्टेंबर अशी नवी डेडलाईन ठेवली होती. आता पून्हा एकदा 19 सप्टेंबर अशी नवी तारीख मुंबई विद्यापीठाने
दिली आहे.