शिवस्मारकाच्या पायाभरणीला गालबोट, बोट उलटून शिवसंग्राम कार्यकर्त्याचा मृत्यू

शिवस्मारकाच्या पायाभरणीच्या कामाची काल सुरूवात होणार होती, पण त्याआधीच समुद्रात जाणाऱ्या एका बोटीला झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला. या बोटीत 25 जण होते त्यापैकी 24 जणांना सुखरूप वाचवण्यात यश आले, मात्र या दुर्घटनेत सिद्धेश पवार या तरुणाचा मृत्यू झाला. सिद्धेश हा शिवसंग्रामचा कार्यकर्ता होता. सिद्धेश पवारचा मृतदेह दुर्घटना झालेल्या बोटीत सापडला. ही बोट एका […]

शिवस्मारकाच्या पायाभरणीला गालबोट, बोट उलटून शिवसंग्राम कार्यकर्त्याचा मृत्यू

शिवस्मारकाच्या पायाभरणीच्या कामाची काल सुरूवात होणार होती, पण त्याआधीच समुद्रात जाणाऱ्या एका बोटीला झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला.

या बोटीत 25 जण होते त्यापैकी 24 जणांना सुखरूप वाचवण्यात यश आले, मात्र या दुर्घटनेत सिद्धेश पवार या तरुणाचा मृत्यू झाला. सिद्धेश हा शिवसंग्रामचा कार्यकर्ता होता.

सिद्धेश पवारचा मृतदेह दुर्घटना झालेल्या बोटीत सापडला. ही बोट एका खडकावर आदळल्यानं बुडू लागली. पण त्याठिकाणी सुदैवानं इतर बोटी आल्यानं काही जणांना वाचवण्यात यश आले. पण सिद्धेश पवार मात्र वाचू शकला नाही. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या सिद्धेश पवारचा मृतदेह आज त्याच्या कुटुंबियांच्या हवाली केला जाणार आहे. सेंटजॉर्ज हॉस्पिटलमध्ये रात्री सिद्धेशच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टेम करण्यात आलं. त्याच्या मृतदेहावर आज शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

  • सिद्धेश हा माजी आमदार दत्ताजी आंब्रे यांचा भाचा होता.
  • सहा ते सात वर्षांपासून त्यांनी सीएचे काम सुरू केले होते.
  • सहा महिन्यांपूर्वीच सिद्धेशचे लग्न झाले होते.
  • विनायक मेटे आणि माजी आमदार दत्ताजी तांबे यांचे खूप जुने संबंध होते, त्यामुळे आंब्रे आणि सिद्धेश पवार हे मेटे यांच्या शिवसंग्राम सोबत जोडले गेले होते.
  • त्यातूनच सिद्धेश या कार्यक्रमासाठी गेला होता.
  • बोट बुडाली तेव्हा सिद्धेश बोटीतून बादलीने पाणी उपसत होता.
  • सगळे लोक बोटीतून बाहेर पडेपर्यंत तो पाणी उपसत होता, पण त्याला स्वत:लाच बाहेर पडता आले नाही.
  • रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुंदे हे सिद्धेशचे मूळ गाव होते. दरम्यान सरकारनं सिद्धेशच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत जाहीर केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number