मुंबई मेट्रो १ ची वाहतूक तांत्रिक बिघाडामुळे विस्कळीत झाली होती. मात्र, तांत्रिक बिघाड दूर झाल्याने मुंबई मेट्रोची वाहतूक सुरळीत झाली आहे.
मेट्रो सेवा तांत्रिक बिघाडामुळे विस्कळीत झाल्यानंतर आता मेट्रो सेवा पूर्ववत झाली असल्याची माहिती मेट्रोने ट्विट करत दिली आहे. त्यांनी ट्विट केले की, मेट्रोची वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे. तर मेट्रो वेळापत्रकानुसार धावणार आहेत. तसेच प्रवाशांची गैरसोय झाल्याबद्दल मेट्रोने दिलगीरी व्यक्त केली आहे.
SERVICE UPDATE | Normal train operation has resumed and trains will be as per schedule. Regret the inconvenience. #HaveANiceDay — Mumbai Metro (@MumbaiMetro01) April 18, 2022
मुंबईतील साकीनाका मेट्रो स्थानकाजवळ तांत्रिक बिघाडामुळे मेट्रोची वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे घाटकोपर ते वर्सोवा दरम्यानची मेट्रो सेवा विस्कळीत झाली होती. मुबंई मेट्रो १ची सेवा सुमारे १५ ते २० मिनिटे उशीरा झाली होती. त्यामुळे मेट्रोने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांची गैरसोय झाली मात्र, आता मुंबई मेट्रो १ सेवा पूर्ववत झाली आहे.