Mumbai Local Mega Block : रविवारी लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! मध्य व पश्चिम रेल्वेकडून रविवारचा मेगा ब्लॉक रद्द

मुंबई लोकलसेवेच्या तिन्ही मर्गांवर रविवारी रेल्वेच्या देखभालीसाठी विशेष मेगा-ब्लॉक घेतला जातो. ज्यामुळे अनेकदा लोकल गाड्यांना विलंब होतो ज्याचा परिणाम प्रवाशांना भोगावा लागतो.

Mumbai Local Mega Block : रविवारी लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! मध्य व पश्चिम रेल्वेकडून रविवारचा मेगा ब्लॉक रद्द

मुंबई लोकलसेवेच्या तिन्ही मर्गांवर रविवारी रेल्वेच्या देखभालीसाठी विशेष मेगा-ब्लॉक घेतला जातो. ज्यामुळे अनेकदा लोकल गाड्यांना विलंब होतो ज्याचा परिणाम प्रवाशांना भोगावा लागतो. मात्र आज 21 जून रोजी मुंबईतील तिन्ही मर्गावर कोणताही मेगाब्लॉक घेण्यात येणार नाही. आज 21 जून रोजी NEET-2026 परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेवर कोणताही मेगा ब्लॉक घेण्यात येणार नाही. सर्व मार्गांवर उपनगरीय रेल्वेच्या सेवा नियमित वेळापत्रकानुसार सुरळीतपणे चालतील. 

नीट (यूजी) 2026 परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांच्या सोयीसाठी, मध्य रेल्वेने सर्व 1,820 उपनगरीय सेवा रविवारी सुरू राहतील असे जाहीर केले आहे. पश्चिम रेल्वेने मुंबई लोकल ट्रेनबाबतची माहिती देताना गुरुवारी सांगितले की, राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET) लक्षात घेता, रविवार, 21 जून 2026 रोजी उपनगरीय सेवांवर चालवण्यात येणारा जंबो ब्लॉक रद्द करण्यात आला आहे.

हेही वाचा- Mumbai Rain : उकाड्याने हैराण मुंबईकरांना दिलासा! अनेक परिसरात पावसाची हजेरी

सर्व मार्गांवर उपनगरीय रेल्वेगाड्यांचे संचालन सुरळीत आणि अखंडितपणे सुरू राहावे यासाठी, रेल्वे प्रशासनाने त्या दिवशी कोणताही मोठा रेल्वेमार्ग अवरोध (मेगा ब्लॉक) न लावण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईकरांसाठी रविवार हा सहसा सुट्टीचा दिवस असतो आणि रेल्वे सेवा मर्यादित असतात, पण यावेळी परिस्थिती वेगळी असेल.

मध्य रेल्वेने जाहीर केले आहे की, रविवार, 21 जून, 2026 रोजी होणाऱ्या नीट-यूजी 2026 परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी लोकल ट्रेन पूर्ण कामकाजाच्या दिवसाच्या वेळापत्रकानुसार नेहमीप्रमाणे धावतील. मोठ्या संख्येने नीट (यूजी) परीक्षा देणारे विद्यार्थी आणि त्यांचे पालक कोणत्याही विलंबाशिवाय किंवा गैरसोयीशिवाय परीक्षा केंद्रांवर प्रवास करू शकतील, हे सुनिश्चित करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number