Mumbai Kurla Firing : मुंबई हादरली! कुर्ला पश्चिम येथे एका इसमावर गोळीबार; परिसरात भीतीचे वातावरण

मुंबईच्या कुर्ला पश्चिम हलाव पुल जवळ बुधवारी रात्री एका इसमावर गोळीबार झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.

Mumbai Kurla Firing : मुंबई हादरली! कुर्ला पश्चिम येथे एका इसमावर गोळीबार; परिसरात भीतीचे वातावरण

मुंबईच्या कुर्ला पश्चिम हलाव पुल जवळ बुधवारी रात्री एका इसमावर गोळीबार झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. बाबा एलप्पा पवार नावाच्या इसमावर गोळीबार झाल्याची माहिती असून त्याला कुर्ला येथील भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु असून त्याची परिस्थिती क्रिटिकल असल्याची माहिती आहे. 29 एप्रिल बुधवारी रात्री 8.30 वाजताच्या सुमारास झालेल्या या घटनेनंतर स्थानिक पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली.

त्यानंतर फॉरेन्सिक टीमने  तपासासाठी सॅम्पल्स घेतले असून फॉरेन्सिक तपास करिता पाठविण्यात आला आहे. स्थानिक डीसीपी आणि इतर पोलीस टीम रात्री उशिरा घटनास्थळी आणि रुग्णालयात होती. या घटनेसंदर्भात कुर्ल्याच्या वी बी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमीची आपराधिक पार्श्वभूमी असून हा आपसातील वाद आहे की गँगवार आहे याची चौकशी सुरू आहे. मात्र पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चौकशी सुरू आहे. लवकरच या घटनेचा छडा लागणार पोलिसांची माहिती

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number