Mumbai Fire: मुंबईत मोठी दुर्घटना! ‘नामांकित’ रुग्णालयात सिलिंडरचा भीषण स्फोट; 2 कर्मचारी होरपळले

मुंबईतील जोगेश्वरी (पश्चिम) येथील मल्लिका रुग्णालयात आगीची दुर्दैवी घटना घडली आहे. या रुग्णालयाच्या टेरेसवरील गॅस गळतीमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. या दुर्घटनेत दोन कर्मचारी

Mumbai Fire: मुंबईत मोठी दुर्घटना! ‘नामांकित’ रुग्णालयात सिलिंडरचा भीषण स्फोट; 2 कर्मचारी होरपळले

मुंबईतील जोगेश्वरी (पश्चिम) येथील मल्लिका रुग्णालयात आगीची दुर्दैवी घटना घडली आहे. या रुग्णालयाच्या टेरेसवरील गॅस गळतीमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. या दुर्घटनेत दोन कर्मचारी गंभीररित्या होरपळले असून, त्यांच्यावर युद्धपातळीवर उपचार सुरू आहेत.

मिळलेल्या माहितीनुसार, रुग्णालयाच्या टेरेसवर गॅस सिलिंडर ठेवण्यात आला होता. गॅस गळती झाल्यामुळे सिलिंडर पेट घेतल्याने आगीचा भडका उडाल्याची बाब समोर आले आहे. मात्र आग नेमकी कशामुळे लागली आणि त्यानंतर स्फोट कसा झाला, याचे अधिकृत कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांच्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी काही कर्मचारी टेरेसवर होते. त्यातील एकाला चहा बनवण्यास सांगण्यात आले आणि चहासाठी गॅस पेटवताच अचानक मोठा भडका उडाला, ज्यात दोन कर्मचारी गंभीर भाजले.

हेही वाचा – Nagpur News : हृदयद्रावक घटना! आईसोबत विसर्जनासाठी तलावावर गेलेल्या दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू; परिसरात हळहळ व्यक्त

घटनेनंतर दोन्ही जखमी कर्मचाऱ्यांना तातडीने त्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र भाजण्याचे प्रमाण गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांचे जबाब नोंदवले आहेत, मात्र नातेवाईकांकडून रुग्णालय प्रशासनाविरोधात कोणतीही तक्रार करण्यात आलेली नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

या प्रकरणामुळे रुग्णालयातील गॅस आणि अग्निसुरक्षा व्यवस्थेवर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. रुग्णालय प्रशासनाकडून सुरक्षेबाबतच्या नियमांचे पालन झाले होते का, याची चौकशी होणार आहे. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही, मात्र नियमांचे उल्लंघन आढळल्यास कारवाई होणार असून या घटनेनंतर BMC आणि अग्निशमन दलाने रुग्णालयाच्या सुरक्षा व्यवस्थेची तपासणी करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत. नुकसानीचा आकडा आणि गळतीचे नेमके कारण तपासानंतरच कळेल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number