Bhuleshwarcha Raja Accident: दक्षिण मुंबईत ‘भुलेश्वरचा राजा’च्या आगमन मिरवणुकीत अपघात; 22 फुटी गणेशमूर्ती कोसळण्यामागे हे कारण?

भुलेश्वरच्या राजाची ही मिरवणूक भायखळ्याहून भुलेश्वरच्या दिशेनं निघाली होती. गणपतीचं मोठं उत्साहात आगमन सुरु होतं. यादरम्यानच, मूर्तीचा तोल गेल्यानंतर तिच्याखाली लोक सापडून ही दुर्घटना घडली.

Bhuleshwarcha Raja Accident: दक्षिण मुंबईत ‘भुलेश्वरचा राजा’च्या आगमन मिरवणुकीत अपघात; 22 फुटी गणेशमूर्ती कोसळण्यामागे हे कारण?

Bhuleshwarcha Raja Accident: दक्षिण मुंबईतील भुलेश्वर परिसरात आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या 'भुलेश्वरचा राजा'च्या आगमन सोहळ्यात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. शनिवारी (22 ऑगस्ट) रात्री 9 ते 10 वाजेच्या सुमारास जय अंबे चौकातील कबूतरखान्या जवळ, बलराम मर्चंट रोडवर 22 फूट उंच आणि सुमारे 2 टन वजनाची गणेशमूर्ती अचानक असंतुलित होऊन भाविकांच्या अंगावर कोसळली. या भीषण अपघातामुळे ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या मिरवणुकीत एकच घबराट आणि धावपळ उडाली. या अपघातात मंडळाच्या अध्यक्षांसह दोघांचा मृत्यू झाला. तर, 2 लहान मुलींसह 5 जण जखमी झाले.

लोखंडी फ्रेमचे वेल्डिंग तुटल्याने अपघात; पोलिसांकडून एडीआर नोंदवून तपास सुरू
प्राथमिक तपासानुसार, या दुर्घटना प्रकरणात आणखी एक बाब समोर आली आहे. अशा उंच गणेश मूर्तींच्या सपोर्टसाठी वेल्डिंग चा वापर करण्यात येतो. लालबागवरून भुलेश्वरकडे ट्रॉलीवरून आणल्या जाणाऱ्या या गणेशमूर्तीला आधार देणाऱ्या नटबोल्टसोबतच लोखंडी फ्रेमचे वेल्डिंग अचानक तुटल्यामुळे ही मूर्ती पुढे झुकली आणि कोसळली. या वेल्डिंगमध्ये काही त्रुटी असल्याचं समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC), पोलीस, अग्निशामक दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. या दुर्दैवी दुर्घटनेनंतर पोलिसांनी अपघाती मृत्यूची (ADR) नोंद केली असून, मूर्तीच्या बांधकामातील तांत्रिक त्रुटींची सखोल चौकशी सुरू आहे. याशिवाय, दुर्घटनेनंतर काही स्थानिकांनी रस्त्याची अवस्था खराब असल्यामुळे भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दावा केला होता. मात्र, घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर रस्त्यावर अशा प्रकारचे मोठे खड्डे आढळले नसल्याचे समोर आले.

भुलेश्वरच्या राजाची ही मिरवणूक भायखळ्याहून भुलेश्वरच्या दिशेनं निघाली होती. गणपतीचं मोठं उत्साहात आगमन सुरु होतं. गणपती बाप्पा भुलेश्वर परिसरात आला होता. अखिल भुलेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मंडप 50-60 मीटर अंतरावर बाप्पाची मूर्ती आली होती. आधी गणपतीच्या गळ्यातील हार पडला. त्यानंतर मूर्ती हलायला लागली आणि तिचा तोल गेल्यानंतर तिच्याखाली लोक सापडून ही दुर्घटना घडली.

हेही वाचा – Bhuleshwar Cha Ganpati 2026 : भुलेश्वरच्या राजाची 22 फूट उंच मूर्ती मंडपात पोहोचण्याआधीच मोठी दुर्घटना; दोन जण ठार तर अनेक लोक जखमी

गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षांसह दोघांचा करुण अंत; 2 लहान मुलींसह 5 जण जखमी
या अपघातात गंभीर दुखापत झाल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला असून जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृत व्यक्तींमध्ये भुलेश्वरचा राजा गणेशोत्सव मंडळाचे 33 वर्षीय अध्यक्ष संकेत नावशे आणि 30 वर्षीय ब्रिजेश हेमंत जोशी यांचा समावेश आहे. याशिवाय, 5 आणि 7 वर्षांच्या दोन लहान चिमुकलींसह वैभव घेणंद (38), पवन चौरसिया (25) आणि कुणाल काशिद (26) हे पाच जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

– आशिष शेलारांकडून मृतांच्या कुटुंबियांना वैयक्तिक मदत
मंत्री आशिष शेलार यांच्याकडून वैयक्तिक मदत करण्यात आली आहे. सदर घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपये, तर जखमी असलेल्यांना 1 लाख रुपयांची मदत मंत्री आशिष शेलार यांच्याकडून करण्यात आली आहे.

भग्न झालेल्या मूर्तीचे गिरगाव चौपाटीवर विसर्जन; गणेशोत्सवाच्या आनंदावर दुःखाचे सावट
मूर्ती खाली पडल्यामुळे तिचे तीन तुकडे झाले होते; त्यानंतर पोलीस आणि पालिका अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ट्रॅक्टर व डंपरच्या साहाय्याने भग्न मूर्ती रात्रीच गिरगाव चौपाटीवर नेऊन तिचे सन्मानपूर्वक विसर्जन करण्यात आले. गणेशोत्सवाचा सण अवघ्या काही दिवसांवर आला असताना घडलेल्या या भीषण घटनेमुळे संपूर्ण भुलेश्वर आणि दक्षिण मुंबईतील गणेश भक्तांमध्ये प्रचंड शोककळा पसरली आहे.

हेही वाचा – Ashish Shelar On Bhuleshwar cha Raja Accident : भुलेश्वरच्या राजाची भव्य मूर्ती कोसळली! दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, 5 जण जखमी; आशिष शेलारांची मोठी घोषणा

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number