Mumbai-Bengaluru Vande Bharat: ‘या’ तारखेला धावणार मुंबई-बंगळुरू वंदे भारत स्लीपर; प्रवासाचा वेळ 9 तासांनी होणार कमी

या अत्याधुनिक रेल्वेमुळे प्रवासाचा वेळ कमालीचा घटणार असून प्रवाशांना रेल्वे प्रवासाचा एक नवा आणि आलिशान अनुभव मिळणार आहे.<br/>

Mumbai-Bengaluru Vande Bharat: ‘या’ तारखेला धावणार मुंबई-बंगळुरू वंदे भारत स्लीपर; प्रवासाचा वेळ 9 तासांनी होणार कमी

Mumbai-Bengaluru Vande Bharat: मुंबई आणि बंगळुरू या दक्षिण-पश्चिम भारतातील दोन प्रमुख शहरांमधील प्रवाशांसाठी रेल्वेने मोठी भेट दिली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी ऑगस्ट 2026 मध्ये मुंबई-बंगळुरू 'वंदे भारत स्लीपर' ट्रेन प्रवाशांच्या सेवेत रुजू होणार आहे. या अत्याधुनिक रेल्वेमुळे प्रवासाचा वेळ कमालीचा घटणार असून प्रवाशांना रेल्वे प्रवासाचा एक नवा आणि आलिशान अनुभव मिळणार आहे.

प्रवासाचा वेळ 24 तासांवरून थेट 15 तासांवर
सध्या मुंबई ते बंगळुरू प्रवासासाठी 'उद्यान एक्स्प्रेस' हा लोकप्रिय पर्याय उपलब्ध आहे, परंतु या प्रवासाला साधारणपणे 24 तास लागतात. मात्र, वंदे भारत स्लीपरमुळे हे अंतर अवघ्या 15 तासांत कापता येणार आहे. ही ट्रेन रात्री उशिरा सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे पोहोचेल, ज्यामुळे प्रवाशांचा एक पूर्ण दिवस वाचणार आहे. ही सेवा सोलापूर आणि कलबुर्गी मार्गे धावणार असून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते केएसआर बंगळुरू स्थानकांदरम्यान वेगवान कनेक्टिव्हिटी प्रदान करेल.

स्वदेशी तंत्रज्ञान आणि आकर्षक वैशिष्ट्ये
चेन्नई येथील 'इंटिग्रल कोच फॅक्टरी' (ICF) च्या तांत्रिक सहकार्याने BEML ने ही ट्रेन पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर विकसित केली आहे. ही नवी ट्रेन केशरी आणि राखाडी अशा 'न्यू लूक' मध्ये पाहायला मिळेल. रेल्वेच्या विस्तार योजनेनुसार, डिसेंबर 2026 पर्यंत अशा एकूण 12 वंदे भारत स्लीपर गाड्या देशभर सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, जानेवारी 2026 मध्ये हावडा ते कामाख्या दरम्यान देशातील पहिली स्लीपर वंदे भारत सुरू झाली होती; मुंबई-बंगळुरू ही या प्रकारातील देशातील दुसरी रेल्वे ठरणार आहे.

हेही वाचा – MSRTC Scam: ST च्या अधिकाऱ्यांकडूनच महामंडळाला चुना! ग्रॅज्युटी घोटाळ्यात 63 अधिकारी दोषी, प्राथमिक अहवालात धक्कादायक माहिती समोर

हुबळी-पुणे मार्गावरही नवीन हालचाली
केवळ वंदे भारतच नाही, तर रेल्वे प्रशासन मुंबई-बंगळुरू प्रवासासाठी तिसऱ्या पर्यायावरही गांभीर्याने विचार करत आहे. हुबळी आणि पुणे मार्गे एक नवीन 'सुपरफास्ट ट्रेन' सुरू करण्याची योजना असून यामध्ये आरामदायी LHB कोचचा वापर केला जाईल. यामुळे दोन राज्यांमधील व्यापार आणि पर्यटनाला मोठी चालना मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number