जय महाराष्ट्र न्यूज, पालघर
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघरमध्ये कंटेनर आणि टेम्पोचा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता, की त्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. मुंबई-अहमदाबाद हायवेवर चिंचपाडा भागात हा अपघात झाला. मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या कंटेनरचा अपघात झाला.
चालकाचं कंटेनरवरील अचानक नियंत्रण सुटलं असताना तो समोरुन येणाऱ्या दुसऱ्या टेम्पोला धडकला आणि हा अपघात झाला. ही धडक इतकी जोरदार होती की त्यात टेम्पोचा पार चकनाचूर झाला.
अपघातात दोघांना आपला जीव गमवावा लागला. अपघातानंतर कंटेनरमधील सामानही रस्त्यावर पडलं. अपघातामुळे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दोन्ही दिशेने मोठी वाहतूक कोंडी झाली होती. या मार्गावर वाहनांची रेलचाल मोठ्या प्रमाणावर होत असल्याने वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागल्या होत्या.
