Marathi Language Controversy: ‘मराठी बोलणार नाही’ म्हणत भाषेचा अपमान करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला मनसेने शिकवला धडा; व्हिडीओ व्हायरल

मराठी भाषेचा अनादर करणाऱ्या एका सुरक्षा रक्षकाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) पदाधिकाऱ्यांनी चांगलाच धडा शिकवला आहे.

Marathi Language Controversy:  ‘मराठी बोलणार नाही’ म्हणत भाषेचा अपमान करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला मनसेने शिकवला धडा; व्हिडीओ व्हायरल

Marathi Language Controversy:  नवी मुंबईमध्ये मराठी भाषेचा अनादर करणाऱ्या एका सुरक्षा रक्षकाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) पदाधिकाऱ्यांनी चांगलाच धडा शिकवला आहे. “मी मराठी बोलणार नाही” अशी भूमिका घेत या सुरक्षा रक्षकाने मराठी भाषेचा अपमान केला होता. या घटनेची माहिती मिळताच मनसेच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत त्याला जाब विचारला आणि जाहीर माफी मागायला लावली.

कान धरून मागावी लागली माफी 
मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर संबंधित सुरक्षा रक्षकाने आपले कान धरून सर्वांसमोर माफी मागितली. तसेच, “मी इथून पुढे मराठी भाषा शिकणार आणि बोलणार,” असे स्पष्ट करत त्याने आपल्या वर्तनाबद्दल खेद व्यक्त केला. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा – Shegaon Pedha : शेगाव मंदिर परिसरातील पेढ्याचे ते नमुने अप्रमाणित; आरोग्यासाठी उपयुक्त नसल्याचा FDA चा अहवाल

जोपर्यंत मराठी येत नाही, तोपर्यंत कामावर ठेवू नका; मालकाला इशारा
या घटनेनंतर मनसे नेत्यांनी संबंधित आस्थापना किंवा इमारतीचा परिसर जिथे हा सुरक्षा रक्षक तैनात होता, तेथील मालकाला स्पष्ट इशारा दिला आहे. “या सुरक्षा रक्षकाला जोपर्यंत मराठी भाषा बोलता येत नाही, तोपर्यंत त्याला कामावर परत घेऊ नका,” अशी ठाम मागणी मनसेने केली आहे.

स्थानिक आस्थापनांना मनसेचा निर्वाणीचा इशारा
मनसे नेत्यांनी सर्वच आस्थापना आणि व्यावसायिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही कर्मचाऱ्याला किंवा सुरक्षा रक्षकाला कामावर ठेवण्यापूर्वी त्यांना मराठी भाषा येते का, याची शहानिशा केली जावी. महाराष्ट्रात राहून मराठी भाषेचा अनादर करणाऱ्यांना आणि मराठी बोलण्यास नकार देणाऱ्यांना यापुढे सहन केले जाणार नाही, असा सज्जड दमही मनसेने दिला आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number