MNS Warning Auto Drivers: ‘मराठी शिका नाहीतर मुंबई सोडा…’; कांदिवलीत मनसेचा फलक लावून अमराठी रिक्षाचालकांना इशारा

कांदिवलीतील हिंदुस्तान नाका परिसरात मनसेतर्फे मोठे जाहीर फलक उभारण्यात आले आहेत.

MNS Warning Auto Drivers: ‘मराठी शिका नाहीतर मुंबई सोडा…’; कांदिवलीत मनसेचा फलक लावून अमराठी रिक्षाचालकांना इशारा

MNS Warning Auto Drivers: मुंबईतील कांदिवली पश्चिम परिसरात सोमवारी अमराठी रिक्षाचालकांनी अवाजवी आंदोलनाचे हत्यार उपसल्याने तीव्र असंतोष पसरला आहे. टॅक्सी आणि रिक्षाचालकांनी प्रवाशांशी संवाद साधताना मराठी भाषेचा वापर करावा, या राज्य सरकारच्या नियमाला विरोध दर्शवण्यासाठी एकता नगर येथील नवीन म्हाडा टॉवरजवळ अमराठी चालकांनी अचानक रास्ता रोको केला. या आंदोलनामुळे लिंक रोडवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि दैनंदिन प्रवाशांचे तुफान हाल झाले. या आंदोलनादरम्यान काही चालकांनी दादागिरी करत इतरांना सेवा देण्यापासून रोखले, तसेच एका मराठी रिक्षाचालकावर हल्ला केल्याची आणि वाहनांवर दगडफेक केल्याची घटना घडली. याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत दगडफेक करणाऱ्या काही उपद्रवी चालकांना ताब्यात घेतले आहे.

मनसेचा थेट इशारा आणि फलकबाजी
अमराठी रिक्षाचालकांच्या या अरेरावीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आता पूर्णपणे आक्रमक भूमिकेत आली आहे. मुंबईकरांना वेठीस धरण्याचा आणि मराठी चालकांवर हल्ला करण्याचा प्रकार अजिबात खपवून घेतला जाणार नाही, असा कडक इशार मनसेने दिला आहे. कांदिवलीतील हिंदुस्तान नाका परिसरात मनसेतर्फे मोठे जाहीर फलक उभारण्यात आले आहेत. "महाराष्ट्रात आणि मुंबईत व्यवसाय करायचा असेल तर मराठी भाषा शिकून ती बोलावीच लागेल, अन्यथा मुंबई सोडून आपल्या मूळ राज्यात परत जावे," अशा स्पष्ट आणि थेट शब्दांत या फलकांद्वारे अमराठी चालकांना तंबी देण्यात आली आहे.

हेही वाचा – Tukaram Mundhe FDA Navi Mumbai : टँकर उघडताच धक्कादायक कारनामा समोर! तुकाराम मुंढेंच्या टीमची नवी मुंबईत मोठी कारवाई

'मनसे स्टाईल'ने उत्तर देण्याचा निर्धार
या संपूर्ण वादावर मनसेचे विभाग अध्यक्ष दिनेश साळवी यांनी अत्यंत आक्रमक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अमराठी चालकांची ही दादागिरी आणि गुंडगिरी मराठी भूमीत सहन केली जाणार नाही, असे सांगत त्यांनी या वर्तनाला 'मनसे स्टाईल'नेच योग्य ते धडे शिकवले जातील, असा सज्जड दम दिला आहे. मनसेच्या या कठोर पवित्र्यामुळे आणि वक्तव्यांमुळे कांदिवली पश्चिमेत भाषिक मुद्द्यावरून सामाजिक व राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून आणि कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी स्थानिक पोलिसांनी हिंदुस्तान नाका व आसपासच्या संवेदनशील भागात कडक बंदोबस्त तैनात केला आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number