आपल्या व्यंगचित्राद्वारे विरोधकांना धारेवर धरणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा व्यंगचित्रातून पंतप्रधान मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहाला टारगेट केले आहे.
स्वत:च्याच प्रतिमेच्या प्रेमात पडलेला प्रसिद्धी विनायक’, अशी पंतप्रधान मोदींची ओळख करून देऊन त्यांना माध्यमांनी रंगवलेल्या बाप्पाच्या स्वरूपात राज ठाकरेंनी दाखवले आहे. तर समोर स्वत: पंतप्रधान मोदी आपल्या या रुपाची पुजा करत असून या ‘बाप्पा’चा सेवक म्हणून दुसरा तिसरा कुणी नव्हे तर चक्क भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना उंदीर म्हणून दाखविले आहे. या व्यंगचित्रात बाप्पाची पुजा करताना मोदींसह केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी आणि गृहमंत्री राजनाथ सिंह देखील दिसत आहे.
#NarendraModi #AmitShah #PublicityHungry pic.twitter.com/90GMJHxfUo — Raj Thackeray (@RajThackeray) September 17, 2018