Madan Bafna passed away: मावळच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील ज्येष्ठ नेते, माजी मंत्री मदन बाफना यांचे दीर्घ आजारपणामुळे निधन झाले असून ते 85 वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे मावळ तालुक्यासह पुणे जिल्ह्याच्या संपूर्ण राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रा मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
दीर्घ आजाराशी झुंज अपयशी
मदन बाफना यांची संपूर्ण राजकीय कारकीर्द ही प्रदीर्घ आणि प्रभावी राहिली होती. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. दीर्घ आजाराशी झुंज देत असताना अखेर त्यांची प्राणज्यो मालवली. त्यांच्या अचानक मिळालेल्या निधनाची बातमी समोर येताच अनेक राजकी पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केलेला आहे.
मदन बाफना यांनी मावळच्या राजकारणात आपली अनेक वर्षे भूमिका बजावली. 1967 मध्ये मदन बाफना यांनी एलएल.बी.चे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर वकिलीसोबतच त्यांनी सार्वजनिक जीवनात प्रवेश केला. सर्वसामान्य नागरिकांशी असलेला जिव्हाळा आणि कार्यकर्त्यांशी असलेले जवळचे संबंध ही त्यांच्या राजकीय प्रवासाची प्रमुख वैशिष्ट्ये मानली जात होती.
मावळ विधानसभा मतदारसंघातून त्यांनी 1985 तसेच 1990 मध्ये त्यांनी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवली आणि त्यात दोन्ही वेळा विजय सुद्धा मिळवला, त्यामुळे त्यांनी दोन वेळा मावळचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले. विशेष म्हणजे आमदारकीच्या दिवसात त्यांनी मतदारसंघातील प्रश्न विधानसभेत मांडले. त्यानंतर त्यांना मंत्रिमंडाळा त काम करण्याची संधी मिळाली. शरद पवार आणि सुधाकरराव नाईक यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारमध्ये त्यांनी राज्यमंत्री म्हणून आपली जबाबदारी सांभाळली. तसेच महसूल राज्यमंत्री, परिवहन राज्यमंत्री म्हणूनही त्यांनी काम केले.