जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
राष्ट्रीय पुरस्कारांच्या घोषणेसोबतच आजचा दिवस दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्यासाठी आनंद द्विगुणीत करणारा ठरला. ‘पावसाचा निबंध’ या लघुपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहिर झालाय. राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा होताच फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी आपला आनंद व्यक्त केला.
‘पावसाच्या निबंधच्या नावानं चांगभलं! आजच लॉस एंजेलिस येथे पावसाचा निबंधचा वर्ल्ड प्रिमिअर होतोय आणि आजच ही आनंदाची बातमी आली. अभिनंदन टीम आटपाट,’ असं लिहित मंजुळेंनी सोशल मीडियावर आनंद व्यक्त केलाय.