वृत्तसंस्था, पॅरिस
मर्डर सिनेमातून प्रेक्षकांच्या मनावर ठसे उमटवणारी बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावतला तिच्या राहत्या घरातून बाहेर काढण्यात आले आहे. सध्या मल्लिका पॅरिसमध्ये तिच्या बॉयफ्रेण्ड कायरिल ऑक्सेफॅन्ससोबत राहतेय. मल्लिका आपल्या बॉयफ्रेण्डसोबत राहत असलेल्या घराचे भाडे थकल्याने त्यांना घरातून बाहेर काढण्यात आल्याचे समजतयं.
थकलेल्या घरभाड्याची रक्कम 80 हजार युरो म्हणजे तब्बल 64 लाखांच्या घरात आहे. मल्लिका आणि तिच्या बॉयफ्रेण्डकडे पैसे नसल्याने त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आर्थिक चणचण असल्यानेच घरभाडं थकल्याचं सांगितलं जात आहे. परंतु, याबाबत मल्लिकाने ट्विटरवरुन माहिती देत माझे पॅरिसमध्ये माझे घर नाही, जर मला कोणी ते दान करत असेल तर मला त्या घराचा पत्ता पाठवावा. अशा कठोर शब्दांत मल्लिकाने आरोपांना उत्तर दिले.