जय महाराष्ट्र न्यूज, मालेगाव
लग्नसमारंभासाठी गेलेल्या एका तरुणीचा पाय घसरुन मृत्यू झालाय. नेहा पवार असे या मुलीचे नाव आहे. नेहा पंगतीतून जेवण करून उठल्यानंतर पाणी पिण्यासाठी गेली.
पाणी प्यायल्यानंतर ओल्या फरशीवर अचानक पाय घसरला आणि तिचा तोल जावून डोक्यावर आपटली. तिच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने मेंदू मध्ये अतिरिक्त रक्तस्राव झाला.
आणि यामध्येच तिचा मृत्यू झाला. मालेगाव तालुक्यातील वजीरखेडेजवळ ही घटना घडलीय.