Police Dog Retirement : पोलीस दलातील श्वानांसाठी मोठा निर्णय; निवृत्तीनंतरही गृहविभागच करणार देखभाल, सरकारचा आदेश

यापूर्वी 10 वर्षांचा सेवाकाळ पूर्ण झाल्यानंतर या श्वानांना इतर व्यक्ती किंवा संस्थांना दत्तक दिले जात होते.

Police Dog Retirement : पोलीस दलातील श्वानांसाठी मोठा निर्णय; निवृत्तीनंतरही गृहविभागच करणार देखभाल, सरकारचा आदेश

Police Dog Retirement Policy:  महाराष्ट्राच्या पोलीस दलात तब्बल एक दशक सेवा बजावल्यानंतर निवृत्त होणाऱ्या श्वानांसाठी राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील निर्णय घेतला आहे. यापूर्वी 10 वर्षांचा सेवाकाळ पूर्ण झाल्यानंतर या श्वानांना इतर व्यक्ती किंवा संस्थांना दत्तक दिले जात होते. मात्र, या अचानक झालेल्या बदलामुळे आणि नवीन वातावरणाशी जुळवून न घेता आल्याने श्वानांना तीव्र मानसिक तणावाचा सामना करावा लागत असे. अनेक श्वानांनी अन्नाचा त्याग केल्याचे, तर काहींचा यामुळे मृत्यू झाल्याचे विदारक वास्तव समोर आले होते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निष्ठावंत रक्षकांच्या पुनर्वसनासाठी नव्या धोरणाची घोषणा केली आहे.

माजी सहकाऱ्यांसोबतच व्यतीत होणार उर्वरित आयुष्य

शासनाच्या या नवीन धोरणानुसार, 10 वर्षे पूर्ण झाल्यावर श्वान जरी अधिकृतपणे सेवेतून निवृत्त होणार असले, तरी त्यांना पोलीस दलातून किंवा त्यांच्या नियमित सांभाळकर्त्यांपासून वेगळे केले जाणार नाही. ते आयुष्यभर पोलीस दलाचाच भाग राहतील आणि त्यांचे आधीचे हँडलर्सच त्यांची काळजी घेतील. आयुष्यभर सुरक्षेचे कर्तव्य निभावल्यानंतर त्यांना आयुष्याचा शेवटचा काळ अत्यंत सुखाचा, समाधानाचा आणि ओळखीच्या वातावरणात घालवता यावा, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे.

हेही वाचा – Malegaon Kutta Pills Seizure : मालेगावात नशेखोरीचा साठा! 'कुत्ता' गोळी विक्रेत्यांवर पोलिसांची कारवाई; कफ सिरपच्या 1,200 बाटल्या, तर 67 हजार गोळ्या जप्त

अन्न अन् उपचाराचा संपूर्ण खर्च गृह विभागाच्या खांद्यावर

या निवृत्त श्वानांच्या वैद्यकीय देखभाल, दैनंदिन आहार आणि राहण्याच्या संपूर्ण व्यवस्थेची आर्थिक जबाबदारी आता राज्य शासनाचा गृह विभाग उचलणार आहे. त्यामुळे श्वानांच्या आरोग्याची योग्य काळजी घेतली जाईल आणि त्यांना कोणत्याही आर्थिक अडचणीविना सर्व सुविधा पुरवल्या जातील. या निर्णयामुळे प्राणिप्रेमींमधून अत्यंत समाधान व्यक्त केले जात असून, सेवेत असताना निर्माण झालेला श्वान आणि हँडलरमधील भावनिक बंध निवृत्तीनंतरही कायम राहणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number