Pune Ganeshotsav: पुणे पोलिसांचा मोठा निर्णय; गणेशोत्सवात ‘या’ 2 साऊंड सिस्टीमवर पूर्ण बंदी, नियम मोडल्यास थेट…

पोलीस आयुक्तालयात झालेल्या प्रत्यक्ष चाचणीत या सिस्टीम्समुळे ध्वनीमर्यादेचा तीव्र भंग होत असल्याचे सिद्ध झाल्यामुळे हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.<br/>

Pune Ganeshotsav: पुणे पोलिसांचा मोठा निर्णय; गणेशोत्सवात ‘या’ 2 साऊंड सिस्टीमवर पूर्ण बंदी, नियम मोडल्यास थेट…

Pune Ganeshotsav: पुण्यात आगामी गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरू असतानाच मिरवणुकीतील साऊंड सिस्टीम आणि डीजेच्या कर्णकर्कश आवाजाबाबत प्रशासनाने अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे की, यंदाच्या उत्सवात अतिउच्च आवाजाची निर्मिती करणाऱ्या 'प्रेशर मिड' आणि 'प्लाझ्मा' साऊंड सिस्टीमवर 100 टक्के बंदी असेल. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल केले जातील. पोलीस आयुक्तालयात झालेल्या प्रत्यक्ष चाचणीत या सिस्टीम्समुळे ध्वनीमर्यादेचा तीव्र भंग होत असल्याचे सिद्ध झाल्यामुळे हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

नियम मोडल्यास सिस्टीम जप्त
विसर्जन मिरवणुकीदरम्यान ध्वनीप्रदूषण नियंत्रणात ठेवण्यासाठी गणेश मंडळांशी चर्चा करून 4 बेस आणि 4 टॉप वापरण्याची अनधिकृत सीमा निश्चित करण्यात आली आहे. मोकळ्या जागेतील स्थिर कार्यक्रमांसाठी 6 बेस आणि 6 टॉपची मागणी काही मंडळांनी केली असून त्यावर विचार सुरू आहे. मात्र, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कोणतीही गय केली जाणार नाही. नुकत्याच झालेल्या चाचणीदरम्यान नियम डावलून प्लाझ्मा आणि प्रेशर मिड वापरणाऱ्या 6 ठिकाणी पोलिसांनी थेट कारवाई करत संपूर्ण साऊंड सिस्टीम जप्त केली आहे. पोलीस पथकांनी शहरात 1,000 पेक्षा जास्त ठिकाणी आवाजाची तीव्रता मोजली असून, मर्यादेपेक्षा जास्त आवाज आढळलेल्या 148 ठिकाणी कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे.

ढोल-ताशा पथकांच्या सरावावर तक्रारी; मिरवणुकीतील सहभागावर लवकरच नियमावली
केवळ डीजेच नाही, तर शहरात ठिकठिकाणी सुरू असलेल्या ढोल-ताशा पथकांच्या उशिरापर्यंत चालणाऱ्या सरावामुळे होणाऱ्या त्रासाबाबतही नागरिकांच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. विसर्जन मिरवणुकीत प्रत्येक मंडळाला किती ढोल-ताशा पथके समाविष्ट करता येतील, यावर लवकरच अंतिम निर्णय घेतला जाईल. लक्ष्मी रोड, टिळक रोड यांसारख्या मुख्य विसर्जन मार्गांवरील गर्दीचे नियोजन अत्यंत महत्त्वाचे असून, 180 ते 190 प्रमुख गणेश मंडळांशी संवाद साधला जात आहे.

हेही वाचा – Marathi Language Mandate: रिक्षा-टॅक्सी चालकांना मोठा दिलासा; मराठी शिकण्यासाठी राज्य सरकारकडून 1 वर्षाची मुदत

व्यापारी किंवा व्यक्तींच्या दबावाला पोलीस बळी पडणार नाहीत
पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले की, उत्सवाच्या नावाखाली नियम मोडणाऱ्या कोणत्याही व्यापारी किंवा राजकीय दबावाला पोलीस प्रशासन जुमानणार नाही. सर्व निर्णय कायदा, सुव्यवस्था आणि सामान्य पुणेकरांचे आरोग्य लक्षात घेऊनच घेतले जातील. मुख्य विसर्जन मिरवणूक सुरळीत आणि विनाअडथळा पार पडावी, यासाठी पोलीस आणि गणेश मंडळांमध्ये समन्वय साधला जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number