FDA Pune Raid : पुण्यात FDA चा मोठा दणका; कॅम्प भागातील बर्गर किंगसह झेप्टो आणि ब्लिंकिटचे परवाने निलंबित

अन्नसुरक्षेचे मूलभूत नियम धाब्यावर बसवल्याचे समोर आल्यानंतर प्रशासनाने तात्काळ कारवाई करत या आऊटलेटचा परवाना रद्द केला आहे.<br/>

FDA Pune Raid : पुण्यात FDA चा मोठा दणका; कॅम्प भागातील बर्गर किंगसह झेप्टो आणि ब्लिंकिटचे परवाने निलंबित

FDA Pune Raid : पुण्यातील खवय्यांच्या पसंतीस उतरलेल्या आणि दररोज हजारो नागरिकांची वर्दळ असणाऱ्या कॅम्प भागातील प्रसिद्ध ‘बर्गर किंग’ आऊटलेटवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) अत्यंत कडक पाऊल उचलले आहे. अचानक मारलेल्या छाप्यात या ठिकाणी खाद्यपदार्थांची अत्यंत निकृष्ट दर्जाची साठवणूक आणि गंभीर अस्वच्छता आढळून आली. अन्नसुरक्षेचे मूलभूत नियम धाब्यावर बसवल्याचे समोर आल्यानंतर प्रशासनाने तात्काळ कारवाई करत या आऊटलेटचा परवाना रद्द केला आहे.

क्विक-कॉमर्स आणि ऑनलाईन डिलिव्हरी गोदामांची तपासणी
केवळ प्रत्यक्ष हॉटेल्सच नव्हे, तर डिजिटल प्लॅटफॉर्मवरून अन्नपुरवठा करणाऱ्या बड्या कंपन्यांवरही एफडीएने आपला मोर्चा वळवला आहे. लोहगाव येथील ‘झेप्टो’ (Zepto) या ऑनलाईन डिलेव्हरी कंपनीच्या गोदामात केलेल्या पाहणीत अनेक गंभीर त्रुटी उघडकीस आल्या. फ्रोजन आणि रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांसाठी आवश्यक असलेले तापमान नियंत्रित न ठेवणे, मुदत संपलेला साठा बाळगणे आणि कर्मचाऱ्यांची वैयक्तिक अस्वच्छता या कारणांमुळे लोहगावच्या या गोदामाचा परवाना रद्द करण्यात आला आहे.

शहरातील विविध भागांत धाडी; झुरळांचा वावर अन् गंजलेले रॅक्स
प्रशासनाने 13 ऑगस्टला शहराच्या विविध भागांत विशेष मोहीम राबवून कसून तपासणी केली. यामध्ये वारजे येथील ‘स्विनस्टा’ (Swinsta ENT Private Limited), सिंहगड रस्ता-नऱ्हे परिसरातील ‘ब्लिंकिट’ (Blinkit Store) आणि लोणावळ्यातील ‘फॉर्च्यून एंटरप्रायझेस’ (हॉटेल सयाजी) या आस्थापनांचा समावेश आहे. तपासणीदरम्यान अन्नधान्य ठेवलेल्या रॅक्सवर गंज चढलेला दिसला, तसेच खाद्यपदार्थांच्या थेट संपर्कात झुरळांचा मुक्त वावर आढळला.  

हेही वाचा – Kolhapur News : लकी भास्करस्टाईल घोटाळा! खातेदाराच्या नावाने मॅनेजरने 1 कोटी 10 लाखांचे कर्ज उचलले; तब्बल चार वर्षांनंतर प्रकरण उघडकीस

अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत कठोर पावले
अन्न सुरक्षा व मानके कायदा (FSS Act), 2006 मधील तरतुदींचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या कोणत्याही लहान किंवा मोठ्या व्यावसायिकांची गय केली जाणार नाही, असा इशारा एफडीएने दिला असून भविष्यातही अशी तपासणी सत्रे सुरूच राहतील असे संकेत दिले आहेत.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number