Pune Section 37: पुण्यात 14 दिवसांसाठी जमावबंदी! सोशल मीडियावर ‘असे’ रील्स पोस्ट केल्यास थेट तुरुंगवास, पाहा काय आहेत नवीन नियम

पुणे शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 अंतर्गत 14 दिवसांचे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

Pune Section 37: पुण्यात 14 दिवसांसाठी जमावबंदी! सोशल मीडियावर ‘असे’ रील्स पोस्ट केल्यास थेट तुरुंगवास, पाहा काय आहेत नवीन नियम

Section 37 Maharashtra Police Act Pune: पुणे शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. विशेष शाखेचे पोलीस उप-आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1)(2)(3) अंतर्गत 14 दिवसांचे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. हे कडक निर्बंध 18 ऑगस्ट 2026 च्या मध्यरात्री 12:01 वाजेपासून सुरू होऊन 31 ऑगस्ट 2026 च्या रात्री 12:00 वाजेपर्यंत लागू राहतील. आगामी काळातील नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन व ईद-ए-मिलाद यांसारखे उत्सव, राजकीय-सामाजिक आंदोलने आणि महापालिकेची अतिक्रमणविरोधी कारवाई या पार्श्वभूमीवर शहरात तणाव निर्माण होऊ नये म्हणून ही उपाययोजना करण्यात आली आहे.  

'या' प्रमुख कृत्यांवर पोलिसांकडून पूर्णपणे बंदी  
– शस्त्रे व स्फोटकांवर बंदी: लाठ्या-काठ्या, तलवारी, जाळपोळ करणारे किंवा स्फोटक पदार्थ बाळगणे, तसेच दगड किंवा इतर हत्यारे एकत्र जमा करण्यास मनाई आहे.
– जमाव व मिरवणुका: 5 किंवा त्याहून अधिक लोकांनी एकत्र येणे, पूर्वपरवानगीशिवाय जाहीर सभा आयोजित करणे किंवा मिरवणूक काढण्यावर पूर्ण बंदी असेल.
– प्रक्षोभक विधाने व पुतळे दहन: कोणत्याही व्यक्तीचे प्रतीकात्मक पुतळे किंवा प्रतिमांचे प्रदर्शन व दहन करण्यास मनाई आहे. तसेच जातीय तणाव निर्माण करणारी प्रक्षोभक भाषणे, अश्लील घोषणा किंवा प्रक्षोभक फलक प्रदर्शित करता येणार नाहीत.  
– गुन्हेगारी रील्स व डिजिटल दहशत: गुन्हेगारांचे व्हिडिओ किंवा रील्स बनवून सोशल मीडियावर प्रसारित करणे, दहशत पसरवणे अथवा धमक्या देणाऱ्या डिजिटल कंटेंन्टवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

हेही वाचा – Devendra Fadnavis : 'भेसळखोरांना सोडणार नाही…'; तुकाराम मुंढेंच्या कामगिरीचं देवेंद्र फडणवीसांकडून कौतुक

राहुल गांधींच्या कार्यक्रमाबाबत शंका; नियम मोडल्यास कलम 135 नुसार कारवाई
याच 14 दिवसांच्या कालावधीत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा पुण्यातील विद्यार्थ्यांसोबत 'छात्रों की गूंज' हा विशेष कार्यक्रम नियोजित आहे. शहरात 5 हून अधिक लोकांच्या एकत्र येण्यावर बंदी असल्याने आता पोलीस प्रशासन या कार्यक्रमाला परवानगी देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, शासकीय सेवेतील कर्मचारी आणि कर्तव्य बजावणारे सुरक्षा रक्षक (ज्यांना 3.5 फुटांपर्यंतची काठी बाळगण्याची परवानगी आहे) यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे. सामान्य नागरिकांनी या नियमांचे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम 135 नुसार कडक कायदेशीर कारवाई, दंड किंवा शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.  

शांतता राखण्यासाठी नागरिकांना सहकार्याचे आवाहन
आगामी सणासुदीच्या दिवसांत जातीय सलोखा आणि शहरातील शांतता टिकवून ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने हे प्रतिबंधात्मक पाऊल उचलले आहे. सोशल मीडियावरील प्रत्येक हालचालीवर आणि संशयास्पद हालचालींवर पोलीस यंत्रणेची करडी नजर असणार आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता तसेच आक्षेपार्ह मजकूर अथवा रील्स शेअर न करता नागरिकांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन पुणे पोलिसांकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा – Vinod Tawde : विधानसभा निवडणुकांसाठी भाजपची नवी रणनीती; विनोद तावडेंकडे दिली 'ही' मोठी जबाबदारी

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number