Gram Panchayat Election : महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकांचा मुहूर्त ठरला?; तारखेबाबत महत्त्वाची अपडेट समोर

गावातील राजकीय हालचालींना आता आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांकडून मोर्चेबांधणी सुरु असतानाच आता निवडणुकीचे वेळापत्रक पुढे जाण्याची शक्यता आहे.

Gram Panchayat Election : महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकांचा मुहूर्त ठरला?; तारखेबाबत महत्त्वाची अपडेट समोर

नाशिक : गावातील राजकीय हालचालींना आता आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांकडून मोर्चेबांधणी सुरु असतानाच आता निवडणुकीचे वेळापत्रक पुढे जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. मतदार यादीच्या या विशेष सखोल पुनरीक्षणामुळे ग्रामपंचायत निवडणुकांच्या प्रक्रियेला काहीसा विलंब होण्याची शक्यता आहे, त्यामुळे गावांना नवे कारभारी मिळण्यासाठी नव्या वर्षाती वाट पाहावी लागू शकते.

मतदानाबाबत नवी अपडेट आली समोर
यंदा राज्यात मुदत संपलेल्या 621 ग्रामपंचाायती आणि नव्याने अस्तित्वात आलेल्या ग्रामंपचायतींच्या निवडणुका होणे हे अपेक्षित आहे. नाशिक जिल्ह्यातील साधारण 62 ग्रामपंचायतींचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे. बऱ्याच ग्रामपंचायतींच्या विद्यमान कार्यकारिणीची मुदत हे संपल्याने गावातील अनेक विकासकामांवर त्याचा मोठा परिणाम झालेला आहे. कारण कार्यकारिणी नसल्याने काही विकासकामे संथगतीने सुरु असून, काही महत्त्वाच्या प्रकल्पांना गती देताना अडचणी येत आहे. त्यामुळेच ग्रामपंचायतींच्या निवडणुका लवकर घेण्याची मागणी होत आहे.

मात्र, सध्याच्या स्थितील निवडणूक यंत्रणा मतदार याद्यांच्या एसआयआर प्रक्रियेत व्यक्त आहेत. भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली राज्यात एसआयआरचा दुसरा टप्पा सुरु झाला आहे. प्रारुप मतदार यादीवरील सर्व हरकती, सुनावणी या प्रक्रिया पूर्ण होताच अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. एसआयआर प्रक्रियेत मतदारांच्या नोंदी या तपासल्या जात असून, त्रुटी असलेल्या या नोंदीबाबत संबंधितांना पुरावे सादर करण्याच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत.

अंतिम मतदार याजी प्रसिद्ध होताच दिवाळीच्या सुट्ट्यांच्या कालावधी हा असल्याने ग्रामपंचायत निवडणुकांचा क्रार्यक्रम हा नोव्हेंबर शेवट किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. निवडणुकीची संपूर्म प्रक्रिया होताच जानेवारी 2027 मध्ये गावांना नवे कारभारी मिळण्याची शक्यता आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number