जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर
कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या नीरव मोदीच्या नगरमधील जमिनीवर शेतकऱ्यांनी कब्जा केलाय. कर्जत तालुक्यातील 250 एकर जमिनीवर शेतकरी रविवारपासून नांगर फिरवत ही जमीन ताब्यात घेणार आहेत.
यावेळी शेतकऱ्यांनी काळी आई मुक्ती संग्रामचा नारा देत घोषणाबाजी केली. व्यवहाराचे शेतकऱ्यांना पैसेही अदा करण्यात आले, तरीही शेतकऱ्यांनी ताबा घेतल्याने नियमबाह्य असल्याचं सांगितलं जातंय. स्त्रियासह जवळपास 200 शेतकरी यामध्ये सामील होते.
त्यामुळे याप्रकरणी आता अंमलबजावणी संचालनालय कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागलंय.