राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. तसेच राज्याच्या रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. राज्यात शनिवार ६ हजार २६९ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ७ हजार ३३२ जण कोरोनातून बरे झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण ६० लाख २९ हजार ८१७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण […]

राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. तसेच राज्याच्या रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. राज्यात शनिवार ६ हजार २६९ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ७ हजार ३३२ जण कोरोनातून बरे झाले आहेत.

राज्यात आतापर्यंत एकूण ६० लाख २९ हजार ८१७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ०.२ ने वाढले असून ९६.३५% इतके झाले आहे.

मुंबईत शनिवारी ४१३ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर ६११ जण बरे होऊन घरी परतले आहेत. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर हा ९७ टक्के इतका झाला असून मुंबईत सध्या ५ हजार ७९९ सक्रिय रुग्ण आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number