राज्यात घडलेल्या अनेक राजकीय घडामोडींनंतर अखेरीस एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदावर बसले. राज्यात चालेल्या राजकीय घडामोडींवर सगळ्यांचाच लक्ष लागून होत आणि त्यासोबतच यावर्षी विठुरायाच्या पूजेचा मान यंदा कोणाला? हा प्रश्न देखील अनेकांच्या मनात होता. परंतु मुख्यमंत्री पदाची शप्पत घेताच विठुरायाच्या पूजेचा मन देखील एकनाथ शिंदे यांनाच मिळणार हे सुद्धा निश्चित झाले.
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात प्रथेप्रमाणे आज पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शासकीय महापूजा पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील रुई गावच्या मुरली बबन नवले आणि त्यांच्या पत्नी जिजाबाई मुरली नवले या शेतकरी दाम्पत्याला विठुरायाच्या शासकीय महापूजेचा मान मिळाला, मुरली नवले हे दरवर्षी न चुकता सलग वारी करत आहेत. तसेच, ते श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातही गेल्या 12 वर्षांपासून पायी वारी करत आहेत. असंख्य वारकऱ्यांच्या उपस्थितीत त्यांनी त्यांच्या पत्नी लता यांच्यासह विठुरायाची महापूजा केली. या पूजेदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वडील संभाजी शिंदे, पुत्र श्रीकांत शिंदे आणि नातू रुद्रांश शिंदे सुद्धा उपस्थित होते.
त्याबरोबरच शासकीय महापूजा पार पडल्यानंतर पहाटे इस्कॉन आंतरराष्ट्रीय मंदिराचा भूमिपूजन कार्यक्रम पार पडला. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुढील अनेक कार्यक्रमांसाठी हजेरी लावणार आहेत
Publish By : Janhvi Chavan