LPG Gas Cylinder: मोठा दिलासा! आता पुन्हा घरपोच मिळणार LPG गॅस सिलिंडर; मात्र ‘हा’ नवा नियम जाणून घ्या

एलपीजी गॅस सिलिंडर ग्राहकांसाठी मोठा दिलासा मिळाला असून भारत गॅसने घरपोच सेवा पुन्हा सुरू केली आहे. मात्र आता नवीन नियमांनुसार ओटीपी पडताळणीशिवाय सिलिंडर मिळणार नाही.

LPG Gas Cylinder: मोठा दिलासा! आता पुन्हा घरपोच मिळणार LPG गॅस सिलिंडर; मात्र ‘हा’ नवा नियम जाणून घ्या

LPG Gas Cylinder: देशभरातील एलपीजी ग्राहकांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून गॅस सिलिंडर पुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्यानंतर आता भारत गॅसकडून घरपोच गॅस सिलिंडर सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे विशेषतः ग्रामीण भागातील ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र, यासोबतच केंद्र सरकारने गॅस वितरणाच्या नियमांमध्ये महत्त्वाचा बदल केला असून आता ओटीपीशिवाय सिलिंडर मिळणार नाही.

आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीचा परिणाम इंधन पुरवठ्यावरही झाला होता. यामुळे अनेक भागांमध्ये एलपीजी गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवत होता. काही ठिकाणी वितरण व्यवस्था विस्कळीत झाल्यामुळे ग्राहकांना वेळेत सिलिंडर मिळत नव्हते. विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागात घरपोच गॅस सेवा तात्पुरती बंद करण्यात आली होती.

हेही वाचा:MGL Discontinues All Schemes : महानगर गॅस कंपनीने पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर सर्व अनुदान थांबवले; जाणून घ्या बंद झालेल्या योजना

मात्र आता परिस्थिती हळूहळू पूर्ववत होत असून भारत गॅसने पुन्हा घरपोच सिलिंडर सेवा सुरू केली आहे. यापूर्वी एचपी गॅसनेही काही भागांमध्ये घरपोच सेवा सुरू केली होती. आता भारत गॅसच्या या निर्णयामुळे लाखो ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.

दरम्यान, एलपीजी सिलिंडरच्या काळाबाजाराला आळा घालण्यासाठी सरकारने वितरण प्रक्रियेत मोठे बदल केले आहेत. नवीन नियमानुसार ग्राहकांना सिलिंडर बुक करताना नोंदणीकृत मोबाईल नंबरचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. सिलिंडर बुक झाल्यानंतर ग्राहकांच्या मोबाईलवर एक ओटीपी पाठवण्यात येईल. हा ओटीपी दाखवल्यानंतरच ग्राहकांना गॅस सिलिंडर दिला जाणार आहे.

ग्राहकांनी डिलिव्हरी बॉयकडे किंवा गॅस एजन्सीकडे ओटीपी सादर करणे आवश्यक असेल. ओटीपीची पडताळणी झाल्यानंतरच सिलिंडर ग्राहकांच्या ताब्यात दिला जाईल. त्यामुळे बनावट बुकिंग, अवैध विक्री आणि काळाबाजार रोखण्यास मदत होणार असल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा: Share Market Dividends: शेअर बाजारात पडणार डिविडेंटचा पाऊस; 250 कोटींपेक्षा अधिक रक्कम वाटणार 'या' 12 कंपन्या

तसेच, ग्राहकांकडे गॅस पासबुक किंवा संबंधित कागदपत्रे असणेही आवश्यक राहणार आहे. ज्यांचा मोबाईल नंबर अद्याप गॅस एजन्सीकडे नोंदणीकृत नाही, त्यांनी तो तातडीने अपडेट करून घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

गॅस सिलिंडर वितरणातील हा नवीन बदल ग्राहकांच्या सुरक्षेसाठी आणि पारदर्शकतेसाठी महत्त्वाचा मानला जात आहे. घरपोच सेवा पुन्हा सुरू झाल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात असले, तरी नव्या नियमांचे पालन करणे आता प्रत्येक ग्राहकासाठी आवश्यक ठरणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number