Pune: खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह! पुण्यात बेकरीतून आणलेल्या पदार्थात आढळली अळी ;ग्राहकाला मोठा धक्का

पुण्यातील विमाननगरच्या फिनिक्स मार्केटसिटी मॉलमधील पॉल बेकरीच्या खाद्यपदार्थात जिवंत अळी आढळल्याचा ग्राहकाचा दावा आहे.

Pune: खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह! पुण्यात बेकरीतून आणलेल्या पदार्थात आढळली अळी ;ग्राहकाला मोठा धक्का

नामांकित बेकरीमधून खाद्यपदार्थ खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील विमाननगर परिसरातील फिनिक्स मार्केटसिटी मॉलमधील पॉल बेकरीमधून खरेदी केलेल्या खाद्यपदार्थात जिवंत अळी आढळल्याचा दावा ग्राहकाने केला आहे. या प्रकारामुळे खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर आणि स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विनोद टिळेकर यांनी २४ ऑगस्ट रोजी संबंधित बेकरीमधून खाद्यपदार्थ खरेदी केला होता. घरी गेल्यानंतर पदार्थ खाण्यासाठी उघडला असता त्यामध्ये जिवंत अळी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. हा प्रकार पाहून ग्राहकाला मोठा धक्का बसला.

नामांकित दुकानांमधून खाद्यपदार्थ घेताना ग्राहकांकडून स्वच्छता आणि गुणवत्तेबाबत अधिक विश्वास ठेवला जातो. मात्र, अशा ठिकाणी खाद्यपदार्थात अळी आढळल्याचा आरोप समोर आल्याने ग्राहकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर संबंधित खाद्यपदार्थाची साठवणूक, उत्पादन प्रक्रिया आणि स्वच्छतेच्या निकषांचे पालन याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. खाद्यपदार्थांमध्ये अशा प्रकारच्या त्रुटी होऊ नयेत यासाठी संबंधित यंत्रणांनी आवश्यक तपासणी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या प्रकरणात बेकरी व्यवस्थापनाची भूमिका आणि पुढील कारवाई काय होते, याकडे आता लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number