Baramati Govt. Medical College : बारामती रुग्णालयाचे नामकरण वादात! लक्ष्मण हाके यांचा राज्य सरकारला इशारा; OBC समाज आक्रमक

लक्ष्मण हाके यांनी इशारा दिला की, जर रुग्णालयाचे नाव बदलण्याचा प्रयत्न झाला, तर केवळ बारामतीमध्येच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात उग्र आंदोलन छेडले जाईल.

Baramati Govt. Medical College : बारामती रुग्णालयाचे नामकरण वादात! लक्ष्मण हाके यांचा राज्य सरकारला इशारा; OBC समाज आक्रमक

Laxuman Hake Speech on Baramati Govt. Medical College Name : बारामतीमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नामकरणावरून सध्या राजकीय वातावरण तापले असून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी राज्य सरकारला थेट इशारा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मरणार्थ या महाविद्यालयाशी संबंधित रुग्णालयाला त्यांचे नाव देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र, या निर्णयामुळे ओबीसी समाज आक्रमक झाला असून लक्ष्मण हाके यांनी बारामतीमध्ये आंदोलन करत आपला तीव्र निषेध नोंदवला आहे. अहिल्यादेवी होळकरांच्या नावाच्या बाबतीत कोणताही गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही आणि असा प्रयत्न झाल्यास गावोगावी याचे पडसाद उमटतील, असे त्यांनी आपल्या भाषणात बजावले.

अहिल्यादेवी होळकरांच्या नावाशी छेडछाड नको; उग्र आंदोलनाचा दिला इशारा
लक्ष्मण हाके यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले की, बारामतीमधील या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला 31 मे 2023 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासन निर्णयाद्वारे (GR) ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ यांचे नाव दिले आहे. महाविद्यालयाच्या अंतर्गत असलेल्या रुग्णालयावरही अहिल्यादेवींचेच नाव असताना आता ते बदलून स्वर्गीय अजित पवार यांचे नाव देण्याचा प्रयत्न केला जात आहे. अहिल्यादेवी होळकरांच्या नावाशी केली जाणारी ही छेडछाड ओबीसी समाज कदापि सहन करणार नाही, असे हाके यांनी ठणकावून सांगितले.

हेही वाचा – Shashikant Shinde: उद्धव ठाकरे पुन्हा आमदार होणार? शशिकांत शिंदेंनी महाविकास आघाडीच्या रणनीतीबाबत दिले ‘हे’ महत्त्वाचे संकेत

अजित पवार यांच्या नावाला विरोध नाही, पण…
हाके यांनी नमूद केले की, त्यांना अजित पवार यांच्या नावाचा अनादर करायचा नाही. प्रशासकीय आणि राजकीय क्षेत्रातील त्यांचे योगदान मोठे आहे, मात्र ज्या ठिकाणी आधीच अहिल्यादेवींचे नाव दिले गेले आहे, तिथे नाव बदलणे चुकीचे आहे. त्याऐवजी बारामतीमधील कृषी विज्ञान केंद्र (KVK), विमानतळ, विद्या प्रतिष्ठान किंवा बारामती ॲग्रो यांसारख्या संस्थांना अजित पवारांचे नाव द्यावे, अशी सूचना त्यांनी केली. अहिल्यादेवींचे नाव हटवून तिथे इतर कोणाचेही नाव लावणे हा सामाजिक आदर्शांचा अपमान असल्याचे त्यांनी म्हटले. बारामतीमधील सध्याची परिस्थिती संवेदनशील असून पोलीस प्रशासनाने शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. मात्र, लक्ष्मण हाके यांनी इशारा दिला की, जर रुग्णालयाचे नाव बदलण्याचा प्रयत्न झाला, तर केवळ बारामतीमध्येच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात उग्र आंदोलन छेडले जाईल.

प्रशासकीय त्रुटी आणि दुरुस्तीची मागणी
यावेळी लक्ष्मण हाके यांनी साताऱ्याच्या छत्रपती संभाजी महाराज वैद्यकीय महाविद्यालयाचा दाखला देत सांगितले की, तिथे महाविद्यालय आणि रुग्णालय दोन्हीसाठी एकच नाव आहे. बारामतीमधील शासन निर्णयात ‘रुग्णालय’ या शब्दाचा स्पष्ट उल्लेख नसल्याची तांत्रिक त्रुटी काही लोक शोधत आहेत. ही त्रुटी दूर करून अहिल्यादेवी होळकर यांचे नाव महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालय अशा दोन्हीसाठी कायम ठेवावे, अशी मागणी त्यांनी केली. यासाठी पुन्हा एकदा राज्य सरकारकडे शिष्टमंडळ पाठवले जाईल आणि नामकरणाचा जीआर दुरुस्त करण्याची विनंती केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – Nitin Gadkari : गडकरींनी जपली मैत्री! पृथ्वीराज चव्हाण आणि श्रीनिवास पाटील यांच्या पाठपुराव्याला यश; उंब्रज उड्डाणपुलासाठी 133 कोटी मंजूर

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number