फक्त सहा हजार रुपयांसाठी झाली अभिनेत्री कृतिका चौधरीची हत्या

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   अभिनेत्री कृतिका चौधरीच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोन जणांना सोमवारी अटक केली. शकील नसीम खान आणि बासुदास माकमलाल दास अशी त्या दोघांची नावे आहेत.   केवळ सहा हजार रुपयांसाठी कृतिकाची हत्या झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली.   12 जून रोजी 29 वर्षीय मॉडेल कृतिका चौधरी मुंबईतील अंधेरीत राहत्या घरी मृतावस्थेत आढळून आली […]

फक्त सहा हजार रुपयांसाठी झाली अभिनेत्री कृतिका चौधरीची हत्या

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

अभिनेत्री कृतिका चौधरीच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोन जणांना सोमवारी अटक केली. शकील नसीम खान आणि बासुदास माकमलाल दास अशी त्या दोघांची नावे

आहेत.

 

केवळ सहा हजार रुपयांसाठी कृतिकाची हत्या झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

 

12 जून रोजी 29 वर्षीय मॉडेल कृतिका चौधरी मुंबईतील अंधेरीत राहत्या घरी मृतावस्थेत आढळून आली होती. घटना उघडकीस आल्याच्या दोन ते तीन दिवस आधी

डोक्यावर जोरदार वार करुन तिला मारण्यात आल्याचे वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले होते.

 

आरोपी शकीलला नवी मुंबईतील पनवेल, तर बादशाहला मुंबईतील गोवंडीतून अटक करण्यात आली.

 

दोघंही आधीपासूनच कृतिकाला ओळखत होते. कृतिकाने वर्षभरापूर्वी शकिलकडून ड्रग्ज विकत घेतले होते. त्याचे पैसे तिने अद्याप चुकते केले नव्हते.

 

कृतिकाची हत्या झाली त्या रात्री पैशाच्या देवाणघेवाणीवरुन दोघांची तिच्याशी बाचाबाची झाली. त्यामुळे शकीलने तिची हत्या केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number