सध्या देशात पुण्याच्या केतन अग्रवाल प्रकरणाची चर्चा जोर धरून आहे. यासंबंधी सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सर्सकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देणाऱ्या व्हिडिओ बनवल्या जात आहेत. ज्यात काही जण प्रकरणाची माहिती देत आहे, तर काही जण केतनच्या हत्या प्रकरणावर प्रतिकारात्मक कंटेन्ट तयार करत आहेत. अशातच डॉक्टर पदावरील मुस्कान सोनीला या तरुणीने केतन अग्रवाल प्रकरणाचे गांभीर्य न समजता एक आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. ज्यामुळे तिच्या अडचणी वाढल्या आहेत.
डॉ. सोनीनं आरोपी सिया गोयल हिने केतन अग्रवाल सोबत केलेल्या प्रकाराचं समर्थन केलं होतं. डॉ. मुस्कान सोनी व्हिडिओमध्ये म्हणाली होती की, “हे मी काय बघतेय. पुण्यात तो तरुण होता, त्याला केसच नव्हते. आता असं खोटं बोलाल, तर मरणारच ना, दोन पुरुष काय मेले, संपूर्ण पुरुष वर्गात भीती पसरली” हे वक्तव्य करत ती मोठमोठ्याने हसत देखील होती. इतकचं नव्हे तर तिने त्यात ‘I Hate Man’ हॅशटॅग वापरला होता. यानंतर या पोस्टवर चहूबाजूंनी टीका झाली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच डॉ. सोनीची माफी मागितली मात्र ऑल इंडिया डेंटल स्टुडंट्स अँड सर्जन्स असोसिएशननं तिच्या विरोधाच ठाम पवित्रा घेतला आहे.
ऑल इंडिया डेंटल स्टुडंट्स अँड सर्जन्स असोसिएशन्सनं डॉ. मुस्कान सोनीला तिच्या पदावरुन हटवलं आहे. यासोबतच असोसिएशनमधून 5 वर्षांसाठी तिची हकालपट्टी केली आहे. यावेळी AIDSA ने म्हटले आहे की, “त्यांचे वर्तन संघटनेच्या मूल्यांशी आणि नैतिकतेशी विसंगत होते, ज्यामुळे त्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले. निलंबनानंतर, मुस्कान सोनी यांनी त्यांच्या प्रोफाइलवर एक माफीचा व्हिडिओ अपलोड केला. मात्र असोसिएशनच्या कोणत्याही सदस्याला अशा प्रकारची विधानं करण्याची परवानगी नाही. हिंसेला योग्य ठरवणं आणि त्याचा उदोउदो करणं, त्या कृतीला प्रोत्साहन देणं, त्या कृत्याचं समर्थन करणं अतिशय गैर आहे, असं डॉ. मुदौतिया म्हणाले. डॉ. सोनीची AIDSA मध्य प्रदेशच्या खनिजदार पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. असोसिएशनच्या सदस्यपदावरुनही तिला दूर करण्यात आलं आहे. ही कारवाई 5 वर्षांसाठी करण्यात आली आहे.”