चिदंबरमना सीबीआयचा झटका; चेन्नई विमानतळावरुन कार्ती चिदंबरम यांना अटक

वृत्तसंस्था, चेन्नई माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना सीबीआयने मोठा झटका दिला आहे. मनी लॉन्ड्रिग प्रकरणी सीबीआयने चिदंबरम यांचे चिरंजीव कार्ती चिदंबरम यांना अटक केली आहे. बुधवारी दुपारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे. यापूर्वी 26 फेब्रुवारी रोजी दिल्लीच्या न्यायालयाने कार्ती चिदंबरम यांचे सीए एस. भास्कररमन यांना […]

चिदंबरमना सीबीआयचा झटका; चेन्नई विमानतळावरुन कार्ती चिदंबरम यांना अटक

वृत्तसंस्था, चेन्नई

माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना सीबीआयने मोठा झटका दिला आहे. मनी लॉन्ड्रिग प्रकरणी सीबीआयने चिदंबरम यांचे चिरंजीव कार्ती चिदंबरम यांना अटक केली आहे.

बुधवारी दुपारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे. यापूर्वी 26 फेब्रुवारी रोजी दिल्लीच्या न्यायालयाने कार्ती चिदंबरम यांचे सीए एस. भास्कररमन यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

आयएनएक्स मीडियाप्रकरणी भास्कररमन यांना अटक करण्यात आली होती.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number