दख्खनच्या जोतिबाची चैत्र यात्रेला सुरुवात

चांगभलं रे देवा चांगभलं… अशा जय घोषित आकाशाला गवसणी घालणाऱ्या शासन-काठ्या, गुलाल- खोबरं, दवणा यांची उधळण आणि भक्ती भावाने डोंगरावर एकवटलेले लाखो भाविक अशा जल्लोषी वातावरणात असा दख्खनचा राजा ज्योतिबा याची यात्रा उत्साहात झाली. यात्रेला महाराष्ट्रसह, गोआ, आंध्रप्रदेश, कर्नाटक आदी राज्यातून असे लाखो भाविकानी प्रचंड गर्दी केली होती. रस्त्याचे रुंदीकरण, ठिकठिकाणी पार्किंग तळ, आणि नेटक्या […]

दख्खनच्या जोतिबाची चैत्र यात्रेला सुरुवात

चांगभलं रे देवा चांगभलं… अशा जय घोषित आकाशाला गवसणी घालणाऱ्या शासन-काठ्या, गुलाल- खोबरं, दवणा यांची उधळण आणि भक्ती भावाने डोंगरावर एकवटलेले लाखो भाविक अशा जल्लोषी वातावरणात असा दख्खनचा राजा ज्योतिबा याची यात्रा उत्साहात झाली. यात्रेला महाराष्ट्रसह, गोआ, आंध्रप्रदेश, कर्नाटक आदी राज्यातून असे लाखो भाविकानी प्रचंड गर्दी केली होती.

रस्त्याचे रुंदीकरण, ठिकठिकाणी पार्किंग तळ, आणि नेटक्या नियोजनामुळे वाहतूक कोंडीचा भाविकांना त्रास झाला नाही. पश्चिम महाराष्ट्र देवस्थानच्या वतीने ज्योतिबा डोंगरावर गेल्या अनेक दिवसांपासून उपाययोजना करून देण्यात आले आहेत. यात तळपत्या उन्हात बचाव करून देणारी रांग, जागोजागी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वछता गृहे, शौचालये, पार्किंगसाठी वाहन तळ, मोफत बस वाहतूक सेवा, यांसह, विविध सेवांचा समावेश होता.

पाडव्याच्या दिवशी गावोगावी सासन काठी उभा करून ज्योतिबाच्या यात्रेसाठी निघतात. चैत्र षष्टियुक्त सप्तमीला पुष्य नकक्षत्रावर ज्योतिबाचा आठ वर्षाच्या बालक रुपात जन्म झाला. म्हणून यादिवशी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन डोंगरावर केले जाते. यानंतर पौर्णिमेपर्यंत भक्त लोक डोंगरावर यायला सुरुवात होते. चैत्र यात्रेच्या मुख्य दिवशी संपूर्ण डोंगर भक्तांनी खचाखच भरलेला असतो. वाहनतळावर वाहनांके प्रचंड ताफे पहायला मिळतात. सायंकाळ होताच भक्तांची पावले पालखी मार्गाकडे वळतात. सायंकाळी पाच वाजता पालखी सोहळ्याला सुरुवात होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number