JEE Mains Result 2026: JEE Main सत्र 2 चा निकाल जाहीर; 56 विद्यार्थ्यांनी पटकावला 100 पर्सेंटाइल, ‘असं’ डाऊनलोड करा स्कोअरकार्ड

निकाल पाहण्यासाठी उमेदवारांना त्यांचा अर्ज क्रमांक (Application Number) आणि पासवर्ड यांसारख्या लॉगिन क्रेडेंशियल्सचा वापर करावा लागणार आहे.<br/>

JEE Mains Result 2026: JEE Main सत्र 2 चा निकाल जाहीर; 56 विद्यार्थ्यांनी पटकावला 100 पर्सेंटाइल, ‘असं’ डाऊनलोड करा स्कोअरकार्ड

JEE Mains Result 2026: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) JEE Main 2026 च्या सत्र 2 परीक्षेचे निकाल अधिकृतपणे जाहीर केले आहेत. या अत्यंत महत्त्वाच्या परीक्षेला बसलेले लाखो उमेदवार आता अधिकृत संकेतस्थळ jeemain.nta.nic.in वर जाऊन आपला निकाल आणि स्कोअरकार्ड पाहू शकतात. निकाल पाहण्यासाठी उमेदवारांना त्यांचा अर्ज क्रमांक (Application Number) आणि पासवर्ड यांसारख्या लॉगिन क्रेडेंशियल्सचा वापर करावा लागणार आहे.

विक्रमी विद्यार्थ्यांची 100 पर्सेंटाइलकडे झेप
यावर्षीच्या सत्र 2 परीक्षेत तब्बल 56 विद्यार्थ्यांनी 100 पर्सेंटाइल मिळवून दैदिप्यमान यश संपादन केले आहे. 2, 4, 5, 6, 7 आणि 8 एप्रिल 2026 रोजी ही परीक्षा देशभरातील 304 शहरांमधील सुमारे 566 केंद्रांवर पार पडली होती. याशिवाय परदेशातील 14 शहरांमध्येही ही परीक्षा 'संगणक-आधारित चाचणी' (CBT) पद्धतीने घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी देशभरातून सुमारे 11.23 लाख उमेदवारांनी हजेरी लावली होती.

निकाल कसा तपासावा? (स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस)
उमेदवारांना आपला निकाल पाहण्यासाठी खालील सोप्या पद्धतींचा अवलंब करता येईल:
– सर्वात आधी jeemain.nta.nic.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
– मुख्यपृष्ठावर (Homepage) दिसणाऱ्या "JEE Main Session 2 Result" या लिंकवर क्लिक करा.
– एक नवीन विंडो उघडेल, तिथे तुमचा अर्ज क्रमांक आणि पासवर्ड अचूकपणे प्रविष्ट करा.
– तपशील भरल्यानंतर 'सबमिट' बटनावर क्लिक करा.
– तुमचा स्कोअरकार्ड स्क्रीनवर दिसेल, तो तपासा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट किंवा पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करून ठेवा.

हेही वाचा – Education Board: शाळांची गणवेश आणि शैक्षणिक साहित्य खरेदीची सक्ती अखेर बंद; शिक्षण विभागाचा कडक निर्णय

पुढील प्रवासासाठी 'कट-ऑफ'कडे लक्ष
निकालासोबतच एनडीएने प्रवर्गनिहाय कट-ऑफ देखील जाहीर केला आहे. जे उमेदवार या परीक्षेत यशस्वी झाले आहेत, ते आता देशातील आयआयटी (IIT) प्रवेशासाठी होणाऱ्या 'JEE Advanced' परीक्षेसाठी पात्र ठरतील. सत्र 1 आणि सत्र 2 या दोन्ही परीक्षांमधील उमेदवाराचा सर्वोत्तम स्कोअर रँकिंगसाठी ग्राह्य धरला जाणार आहे. या यशामुळे आता अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेला वेग येणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number