सरकारकडे मदत मागण्यापेक्षा शाळांनी माजी विद्यार्थ्यांकडे मदत मागावी- प्रकाश जावडेकर

काही शाळा भीकेचा कटोरा घेऊन सरकारकडे मदत मागण्यासाठी येतात. त्याऐवजी माजी विद्यार्थ्यांकडे त्यांनी मदत मागावी. अनेक शाळा ‘गिव्ह अॅण्ड बॅक’च्या माध्यमातून माजी विद्यार्थी चालवतात. त्यामुळे सरकारकडे मदत मागण्याऐवजी या माजी विद्यार्थ्यांकडे मागावी, असं मत केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी मांडलं. पुण्यात ते ज्ञानप्रबोधिनीच्या शैक्षणिक प्रयोग प्रदर्शनानंतर विद्यार्थांशी संवाद साधताना बोलत होते. यावेळी बोलताना जावडेकर […]

सरकारकडे मदत मागण्यापेक्षा शाळांनी माजी विद्यार्थ्यांकडे मदत मागावी- प्रकाश जावडेकर

काही शाळा भीकेचा कटोरा घेऊन सरकारकडे मदत मागण्यासाठी येतात. त्याऐवजी माजी विद्यार्थ्यांकडे त्यांनी मदत मागावी. अनेक शाळा ‘गिव्ह अॅण्ड बॅक’च्या माध्यमातून माजी विद्यार्थी चालवतात. त्यामुळे सरकारकडे मदत मागण्याऐवजी या माजी विद्यार्थ्यांकडे मागावी, असं मत केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी मांडलं. पुण्यात ते ज्ञानप्रबोधिनीच्या शैक्षणिक प्रयोग प्रदर्शनानंतर विद्यार्थांशी संवाद साधताना बोलत होते.
यावेळी बोलताना जावडेकर यांनी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी बीएबीड, बीएस्सी बीएड आणि बीकॉम बीएड सुरू करणार असल्याचं जावडेकर यांनी सांगितलं. शिक्षणावर करोडो रुपयांचा खर्च होतोय मात्र शैक्षणिक सर्वेक्षणानुसार अनेक विद्यार्थ्यांना मागील वर्षीचा अभ्यासक्रम सुद्धा येत नसल्याचं आढळून आलंय. त्यामुळं आता काही नोकरी नाही, म्हणून शिक्षक झाला हे जमणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला. आपलंही शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झालं असून आपली आई शिक्षका असल्याची आठवण यावेळी जावडेकर यांनी जागवली.

जावडेकर यांच्या भाषणातील मुद्दे-

पन्नास टक्के अभ्यासक्रम कमी करणार
त्यामुळं सर्वांगीण शिक्षणाला वेळ मिळेल.
या संदर्भात एक लाख सूचना आल्या असून काम सुरु आहे.
त्याचबरोबर ‘सर्व शिक्षा अभियाना’नं 90 टक्के मुलं शाळांत येऊ लागली, मात्र आठवीपर्यंत परीक्षाच नसल्यानं स्पर्धात्मक शिक्षणासाठी परीक्षा गरजेच्या आहेत.
यासंदर्भात लोकसभेत विधेयक पारित झालं असून राज्यसभेतही पारीत होणार आहे.
विद्यार्थी मार्च महिन्यात अनुत्तीर्ण झाल्यास मे महिन्यात परिक्षा घेण्यात येतील.
शिक्षणात देशाला बदलण्याची ताकद आहे.
शोधांशिवाय देश पुढे जाणार नाही.
येत्या काळात ‘ब्रेन ड्रेन’ नव्हे तर ‘ब्रेन गेन’ करणार.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number