First Baby Birth After 30 Year : काय म्हणता!; ‘या’ गावात 30 वर्षांनंतर झालयं तान्हुल्याचं आगमन, पण असं कसं?

पग्लियारा देई मार्सी या गावात तब्बल 30 वर्षांनंतर पहिल्यांदाच एका बाळाचा जन्म झाला आहे. तिच्यासह या गावाची लोकसंख्या आता 20 वर पोहोचली आहे.

First Baby Birth After 30 Year : काय म्हणता!; ‘या’ गावात 30 वर्षांनंतर झालयं तान्हुल्याचं आगमन, पण असं कसं?

Baby Birth In Italy Village : बाळाचा जन्म घरातील प्रत्येकासाठी आनंदाचा ठेवा घेऊन येतो. चिमुकल्याच्या रडण्याच्या आणि नंतर हसण्या-खेळण्याच्या आवाजाने सगळं घर भरून जातं. शेजारपाजारीही उत्साहाचं वातावरण असतं. बाळाचा जन्म कुठल्या आशीर्वादापेक्षा कमी नाही.. पण इटलीतलं एक गाव असं आहे, जिथे मागच्या 30 वर्षांत एकाही कानाने बाळाचे स्वर ऐकले नव्हते. शिवाय, आणखी एक विशेष बाब म्हणजे, या गावात माणसांपेक्षा चक्क मांजरांचा वावर जास्त आहे.

इटलीच्या डोंगराळ भागातील एका शांत गावात… जिथे दशकांपासून फक्त शांतता पसरली होती, तिथे अचानक एका चिमुकल्या जिवाच्या रडण्याचा आवाजाने आसमंत भरून गेला. अ‍ॅब्रुझो प्रांतातील माउंट गिरिफाल्कोच्या पायथ्याशी वसलेले 'पग्लियारा देई मार्सी' हे छोटेसे खेडे गेल्या अनेक वर्षांपासून एका चिमुकल्या रहिवाशासाठी आसुसलेले होते. अरुंद रस्ते, दगडी भिंती आणि डोंगरदऱ्यांच्या कुशीत विसावलेल्या या गावात घराघरांत शिरणारी मांजरेच इथली खरी मालक झाली होती, पण मार्च महिन्यातील एका घटनेने या गावाला जणू नवे चैतन्य दिले.

लारा: 30 वर्षांनंतरचा पहिला किरण
पग्लियारा देई मार्सी या गावात तब्बल 30 वर्षांनंतर पहिल्यांदाच एका बाळाचा जन्म झाला आहे. 'लारा बुसी ट्राबुको' असे या चिमुकलीचे नाव असून तिच्या आगमनाने गावाची लोकसंख्या आता जवळपास 20 वर पोहोचली आहे. लाराच्या बारशाचा सोहळा तिच्या घरासमोरील चर्चमध्ये पार पडला, ज्याला संपूर्ण गाव आणि काही स्थानिक मांजरेही उपस्थित होती. लाराची आई, सिंझिया ट्राबुको यांनी सांगितले की, अवघ्या 9 महिन्यांची त्यांची मुलगी आता इतकी प्रसिद्ध झाली आहे की, ज्यांनी कधी गावाचे नावही ऐकले नव्हते, ते लोकही केवळ लाराला पाहण्यासाठी तिथे गर्दी करत आहेत.

इटलीतील लोकसंख्या घसरणीचा धोका
लाराच्या जन्माचा आनंद मोठा असला, तरी या निमित्ताने इटलीच्या गंभीर होत चाललेल्या लोकसंख्या समस्येवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रीय सांख्यिकी संस्था 'Itat' नुसार:
– 2024 मध्ये इटलीतील जन्माचे प्रमाण 369,944 पर्यंत खाली आले आहे, जे आजवरची नीचांकी पातळी आहे.
– गेल्या 16 वर्षांपासून ही घसरण सातत्याने सुरू आहे.
– इटलीचा प्रजनन दर केवळ 1.18 वर पोहोचला असून, युरोपियन युनियनमधील हे सर्वात कमी प्रमाण आहे.

हेही वाचा – Internet Viral Story: सायबर तज्ज्ञ थकले, आता मानसोपचारतज्ज्ञांचा आधार! एक पासवर्ड आणि 6500 कोटी रुपये पणाला, नेमकं काय झालं?

घसरणीची प्रमुख कारणे
अ‍ॅब्रुझो प्रदेशातील परिस्थिती तर अधिकच गंभीर आहे. 2025 च्या सुरुवातीच्या माहितीनुसार, या भागात गेल्या वर्षीच्या तुलनेत जन्माच्या प्रमाणात 10.2 टक्क्यांनी घट झाली आहे. यामागे अनेक सामाजिक आणि आर्थिक कारणे आहेत:
– नोकऱ्यांमधील अस्थिरता आणि तरुणांचे परदेशात जाणारे लोंढे.
– नोकरी करणाऱ्या मातांसाठी पुरेशा सोयीसुविधांचा अभाव.
– पुरुषांमधील वाढती वंध्यत्व समस्या.
– तरुण पिढीचा मूलच नको असण्याचा वैयक्तिक निर्णय.

रिकामी शहरे आणि वाढते वृद्ध
पग्लियारा देई मार्सी हे केवळ एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. संपूर्ण इटलीमध्ये आज शाळा रिकाम्या होत आहेत, वयोवृद्ध लोकसंख्या वाढत आहे आणि गावेच्या गावे हळूहळू नकाशावरून पुसली जात आहेत. या बदलत्या लोकसंख्येमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि सार्वजनिक सेवांवर प्रचंड ताण येत आहे. लाराच्या जन्मानंतर या प्रश्नावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा – Pink Parking For Pregnant Women : गर्भवती महिलांसाठी खास गुलाबी पार्किंग; 'या' शहरातील मॉलचा हटके उपक्रम

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number