पंकजा मुंडेंना उमेदवारी नाकारणे दुर्दैवी – खडसे

विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपाकडून सहा उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. भाजप नेते प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, राम शिंदे, श्रीकांत भारतीय उमा खापरे, यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर सदाभाऊ खोत अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. दरम्यान, भाजप नेते पंकजा मुंडे यांना विधानसभा निवडणुकीची उमेदवारी न दिल्यामुळे मुंडे समर्थक नाराज झाले आहेत. तसेच शिवसेना खासदार आणि राष्ट्रवादीचे नेते […]

पंकजा मुंडेंना उमेदवारी नाकारणे दुर्दैवी – खडसे

विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपाकडून सहा उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. भाजप नेते प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, राम शिंदे, श्रीकांत भारतीय उमा खापरे, यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर सदाभाऊ खोत अपक्ष निवडणूक लढवणार आहेत.

दरम्यान, भाजप नेते पंकजा मुंडे यांना विधानसभा निवडणुकीची उमेदवारी न दिल्यामुळे मुंडे समर्थक नाराज झाले आहेत. तसेच शिवसेना खासदार आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनीही भाजपवर टीका केली. पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेची उमेदवारी नाकारल्याच्या मुद्द्यावरून खडसेंनी भाजपला फटकारले आहे.

भाजपाने कोणाला उमेदवारी द्यायची हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. मात्र, पंकजा मुंडे यांच्यावर अन्याय झाला आहे. भाजपाने पंकजा मुंडे यांची उमेदवारी नाकारणे दुर्दैवी असल्याची टीका एकनाथ खडसे यांनी केली आहे. एकेकाळी भाजपापासून महाराष्ट्रातील बहुजन समाज दूर होता. त्या काळात फरांदे सर, अण्णा डांगे, एकनाथ खडसे, भाऊसाहेब फुंडकर आणि प्रमोद महाजन या नेत्यांनी भाजपचा चेहरा बदलला.

खडसे आमि निंबाळकर यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी 

राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे आणि रामराजे निंबाळकर यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपाचे कमळ सोडून राष्ट्रवादीचे घड्याळ हातात घालणारे एकनाथ खडसे यांना उमेदवारी देण्यात आल्यामुळे खडसेंचे पुनर्वसन होणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number