देशात सहा आठवड्यानंतर कोरोना रुग्णसंख्येला ब्रेक

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून देश हळूहळू सावरत असून दैनंदिन रुग्णसंख्याही दिवसेंदिवस घटत होत असल्याचं पाहायला मिळत आहे. शनिवारी गेल्या ४५ दिवसांतील सर्वांत कमी रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. शनिवारी देशात एक लाख ७३ हजार ७९० नवे रुग्ण आढळले. ४५ दिवसांतील हा नीचांक आअसून या नव्या रुग्णांमुळे देशातील आतापर्यंतची रुग्णसंख्या २ कोटी ७७ लाख २९ हजार २४७ झाली […]

देशात सहा आठवड्यानंतर कोरोना रुग्णसंख्येला ब्रेक

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून देश हळूहळू सावरत असून दैनंदिन रुग्णसंख्याही दिवसेंदिवस घटत होत असल्याचं पाहायला मिळत आहे. शनिवारी गेल्या ४५ दिवसांतील सर्वांत कमी रुग्णसंख्येची नोंद झाली आहे.

शनिवारी देशात एक लाख ७३ हजार ७९० नवे रुग्ण आढळले. ४५ दिवसांतील हा नीचांक आअसून या नव्या रुग्णांमुळे देशातील आतापर्यंतची रुग्णसंख्या २ कोटी ७७ लाख २९ हजार २४७ झाली आहे. साप्ताहिक रुग्णनिदान दर ९.८४ टक्के आहे. शनिवारी दिवसभरात ३६१७ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या ३ लाख २२ हजार ५१२ झाली आहे.

देशात २२ लाख २८ हजार ७२४ रुग्ण उपचाराधीन आहेत. हे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या ८.०४ टक्के आहे. रुग्ण बरे होण्याचा दर ९०.८० टक्के झाला असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या २ कोटी ५१ लाख ८८ हजार ११ आहे, तर मृत्यू दर १.१६ टक्के इतका आहे.

 

 

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number