Dharashiv Dhonde Jevan Gift Viral : अधिकमास, इंधन दरवाढ अन् धोंडे जेवण…; सासऱ्याकडून जावयाला सिंधी घोडीची अनोखी भेट

अधिक महिन्यामध्ये जावयाला धोंडे जेवण करून सोन्याची अंगठी देण्याची प्रथा आहे. मात्र पेट्रोल डिझेलची वाढती महागाई पाहून धोंडे जेवणाला सासऱ्याकडून जावयाला सिंधी घोडी भेट दिली आहे.

Dharashiv Dhonde Jevan Gift Viral : अधिकमास, इंधन दरवाढ अन् धोंडे जेवण…; सासऱ्याकडून जावयाला सिंधी घोडीची अनोखी भेट

पेट्रोल डिझेलची वाढती महागाई पाहून धोंडे जेवणाला सासऱ्याकडून जावयाला सिंधी घोडी भेट दिली आहे. भारतीय पंचांगानुसार दर 3 वर्षांनी येणाऱ्या वाढीव महिन्याला ‘अधिकमास’ असे म्हटले जाते. अधिक महिन्यामध्ये जावयाला धोंडे जेवण करून सोन्याची अंगठी देण्याची प्रथा आहे. मात्र सोन्याचे वाढलेले बाजार भाव त्याचबरोबर पेट्रोल आणि डिझेलची वाढती महागाई लक्षात घेता, धाराशिवमधील भूम तालुक्यातील इट येथील क्रांतीसिंह राऊत यांना त्यांचे सासरे विलास झांबरे यांनी धोंडे जेवणाची भेट म्हणून सिंधी जातीची घोडी दिली आहे.

‘कोणतीच कल्पना न देता त्यांनी शेती उपयोगी पार्सल पाठवले आहे धोंडे जेवणानिमित्त ते स्वीकारा’ असे सांगितले. ज्यावेळी प्रत्यक्षात पाहिलं त्यावेळेस सुंदर सिंधी जातीची घोडे पाहून आनंद वाटला, असे मत जावई क्रांतीसिंह राऊत यांनी व्यक्त केले. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या महागाई वरून आणि सोन्याच्या वाढत्या बाजारभावावरून सासऱ्याने जावयासाठी भेट देताना लढवलेली ही अनोखी शक्कल चर्चेचा विषय ठरत आहे.

हेही वाचा- HC On Marriage: ‘पत्नी म्हणजे नोकराणी नव्हे, घरकाम न जमणे ही क्रूरता ठरत नाही…’; मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
अधिकमास आणि धोंडे जेवणाचे शास्त्र
धार्मिक शास्त्रांनुसार अधिकमासाला ‘मलमास’ असेही म्हणतात. हा महिना केवळ ईश्वराची भक्ती, उपासना आणि आत्मिक शुद्धीसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. विवाह, मुंज, गृहप्रवेश किंवा नवीन व्यवसायाची सुरुवात यांसारखी ऐहिक सुखांशी संबंधित कामे या काळात वर्ज्य मानली जातात. यामागील मूळ उद्देश हा आहे की, माणसाने ऐहिक व्यापांतून थोडा वेळ बाजूला काढून आपली साधना पूर्ण करावी. या महिन्यात ‘धोंडे’ (गुळाचे गोड पदार्थ) देण्याची प्रथा असून मुलगी आणि जावयाला लक्ष्मी-नारायणाचे स्वरूप मानून वाण दिले जाते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number