रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा ७ विकेटने पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने २-१ च्या फरकाने ऑस्ट्रेलिवर मालिका विजय मिळवला.
या मालिका विजयानंतर आयसीसी वनडे रॅंकिग जाहीर (ICC ODI rankings)केली आहे.
आयसीसीने जारी केलेल्या ताज्या रॅंकिगनुसार कॅप्टन विराट कोहली आणि हिटमॅन रोहित शर्मा या दोघांनी आपले स्थान कायम ठेवले आहे.
विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोघे अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर कायम आहेत. या दोन्ही खेळाडूंनी ऑस्ट्रेलिया विरुद्ध चांगली कामगिरी केली.
विराट ८८६ गुणांसह पहिल्या तर रोहित ८६८ पॉईंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तीन मॅचच्या सीरिजमध्ये विराटने १८३ धावा केल्या. तर रोहितने देखील १७१ रन्स केल्या.
टीम इंडियात कॅमबॅक केलेल्या शिखर धवनला ७ स्थानांचा फायदा झाला आहे. धवनने २२ क्रमांकावरुन १५ क्रमांकावर झेप घेतली आहे.
तर केएल राहुलने तब्बल २१ स्थानांची मोठी झेप घेऊन ५० व्या स्थानी पोहचला आहे. केएल राहुलने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत १४६ धावा कुटल्या.
आयसीसीच्या बॉलर्सच्या रॅंकिगमध्ये बुमराहला देखील आपले पहिले स्थान कायम ठेवण्यास यश आले आहे.
बुमराह ७६४ पॉईंट्ससह पहिल्या क्रमांकावर कायम आहे.
ऑलराऊंडर खेळाडूंच्या यादीत टीम इंडियाच्या रविंद्र जडेजानी ४ स्थानांची उडी घेऊन १० वा क्रमांक पटकावला आहे.
तसेच जडेजा बॉलर्सच्या यादीत २७ व्या क्रमांकावर आहे.
दरम्यान टीम इंडिया आता न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे.
टीम इंडियाचा न्यूझीलंड दौरा हा भरगच्च असा असणार आहे. टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध ५ टी-२०, ३ वनडे आणि २ कसोटी सामने खेळणार आहे.