‘कोरोना लस घेतली नाही आणि घेणारही नाही’; इंदुरीकर महाराजांचे वादग्रस्त विधान

  नुकताच देशाने १०० कोटी लसीकरणाचा टप्पा पार केला आहे. तर देशभरात नागरिकांना कोरोना लसीकरण घेण्यासाठी प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे. अशातच ‘मी कोरोना लस घेतली नाही आणि घेणार पण नाही’ असे वादग्रस्त वक्तव्य कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी केले आहे.   नाशिक जिल्ह्यात इंदुरीकर महाराजांनी पुन्हा एकदा आपल्या कीर्तनात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. एकीकडे सरकार […]

‘कोरोना लस घेतली नाही आणि घेणारही नाही’; इंदुरीकर महाराजांचे वादग्रस्त विधान

  नुकताच देशाने १०० कोटी लसीकरणाचा टप्पा पार केला आहे. तर देशभरात नागरिकांना कोरोना लसीकरण घेण्यासाठी प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे. अशातच ‘मी कोरोना लस घेतली नाही आणि घेणार पण नाही’ असे वादग्रस्त वक्तव्य कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी केले आहे.

  नाशिक जिल्ह्यात इंदुरीकर महाराजांनी पुन्हा एकदा आपल्या कीर्तनात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. एकीकडे सरकार लस घेण्याचे आवाहन करत आहेत तर दुसरीकडे भर कीर्तनात ‘मी कोरोनाची लस आतपर्यंत घेतली नाही आणि घेणार पण नाही’ असे वक्तव्य त्यांनी केले आहे. तसेच कोरोनावरील एकमेव उपाय म्हणजे मन खंबीर ठेवणे, असे ते म्हणाले.

  इंदुरीकर महाराज म्हणाले, ‘कोरोना काळात अनेक नागरिकांचे निधन झाले आहे. ज्यातील निम्मे नागरिक तणावामुळे मरण पावली. प्रत्येकाची प्रतिकारशक्ती ही वेगवेगळी असते. प्रत्येकालाच कोरोना होत नसतो. त्यामुळे कोरोनावर मन खंबीर ठेवणे हा उपाय आहे.’ असे ते म्हणाले.

  लोकनेते स्वर्गीय गोपाळरावजी गुळवे यांच्या ८१व्या जयंती निमित्ताने नाशिक जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी मेळावा आणि इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी मी कोरोना लस घेतली नाही आणि घेणारही नाही असे वक्तव्य केले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number