‘राज्याच्या राजकारणात मला रस’

राष्ट्रवादी काँग्रेसचा आज वर्धापन दिन पार पडला. या वर्धापन दिनानिमित्त दिल्लीत कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी वर्धापन दिनाचे औचित्य साधत पक्षाने कार्यकारी अध्यक्ष म्हणून प्रफुल पटेल आणि सुप्रिया सुळे यांची नियुक्ती केली. मात्र, या निवडीमध्ये राष्ट्रवादी नेते अजित पवार यांचे नसल्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चा समोर आल्या. मात्र, आता पुण्यात दाखल होताच अजित पवार यांनी […]

‘राज्याच्या राजकारणात मला रस’

राष्ट्रवादी काँग्रेसचा आज वर्धापन दिन पार पडला. या वर्धापन दिनानिमित्त दिल्लीत कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी वर्धापन दिनाचे औचित्य साधत पक्षाने कार्यकारी अध्यक्ष म्हणून प्रफुल पटेल आणि सुप्रिया सुळे यांची नियुक्ती केली. मात्र, या निवडीमध्ये राष्ट्रवादी नेते अजित पवार यांचे नसल्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चा समोर आल्या. मात्र, आता पुण्यात दाखल होताच अजित पवार यांनी नाराजीबाबत भाष्य केले आहे.

या नियुक्तीनंतर शरद पवारयांनी म्हटले की, अजित पवार राज्याचे विरोधी पक्षनेते पदावर आहेत आणि जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष आहेत. आधीच त्यांच्यावर मोठी जबाबदारी असल्याने त्यांना नवी कोणतीही जबाबदारी सोपवली नाही. सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडे तशी कोणतीही जबाबदारी नव्हती, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.तसेच हा माझा वैयक्तिक निर्णय नाही, पक्षानं सामूहिक विचार विनिमयानं घेतलेला हा निर्णय घेतला असल्याचे शरद पवारांनी सांगितले. अजित पवार विरोधी पक्षनेते आहेत. त्यांच्यावर जबाबदारी असल्याचे शरद पवार यांनी म्हटले. त्याचप्रमाणे अजित पवार नाराज आहे असं काहीजण म्हणतात. पण यामध्ये काही तथ्यं नसल्याचेही शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

दरम्यान नाराज असल्याच्या चर्चांवर अजित पवार म्हणाले की, नाराजीच्या असल्या बातम्या देणं बंद करा. सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला. मला वाईट वाटले नाही. माझी फ्लाईट होती, बोलता आलं नाही. मी समाधानी आहे. आमची एक समिती होती. त्यावेळी मी सांगितले की, दोन निर्णय घेतले एक तर राजीनामा मागे घ्या आणि कार्यकारी अध्यक्ष म्हणून सुप्रिया सुळेंना घ्या. तेव्हा सगळ्यांनी आता फक्त राजीनाम्याच्या मुद्यावर इतकचं मुद्दा मांडा सूचना करण्यात आली. त्यावेळी लोकशाही म्हणून त्यावेळी भाष्य करणं टाळले, असे अजित पवार यांनी म्हटले.

प्रफुल्ल भाई आणि मी एकाच वर्षी खासदार झालो. सुप्रिया अनेक वर्ष दिल्लीत आहे.मला महाराष्ट्रातल्या राजकारणात इंटरेस्ट आहे.आता हे तुम्हाला स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का, असा प्रश्न विचारत अजित पवार म्हणाले की,माझ्यावर राज्याचा विरोधी पक्षाची जबाबदारी आहे. ती मी पार पाडत आहे. आज २४ वर्ष पूर्ण झाली राष्ट्रवादीला २४ वर्षात पहिल्यांदा मी दिल्लीला गेलो.कोण कोणाला शह देत नाही. आमचा पार्टी अंतर्गत प्रश्न आहे. इतर कोणी नाक खुपसायचं कारण नाही.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number