पतीने केला पत्नीवर चाकूने हल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद

जय महाराष्ट्र, नवी मुंबई मुंबईच्या मानखुर्द रेल्वे स्टेशन बाहेर पतीने पत्नीवर चाकूने हल्ला केला. यात पत्नी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहे. भर दिवसा पतीने पत्नीवर हल्ला केला, तेव्हा लोकांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली. या महिलेच्या मदतीला कोणीही धावून आले नाही. हा सर्व प्रकार जवळील सीसीटीव्हीत कैद झाला आहे. मानखुर्दमधील विजय […]

पतीने केला पत्नीवर चाकूने हल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद

जय महाराष्ट्र, नवी मुंबई

मुंबईच्या मानखुर्द रेल्वे स्टेशन बाहेर पतीने पत्नीवर चाकूने हल्ला केला. यात पत्नी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहे. भर दिवसा पतीने पत्नीवर हल्ला केला, तेव्हा लोकांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली. या महिलेच्या मदतीला कोणीही धावून आले नाही. हा सर्व प्रकार जवळील सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

मानखुर्दमधील विजय इंगळे याने हे कृत्य केलं असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. विजयची पत्नी गेल्या काही दिवसापासून त्याच्या त्रासाला कंटाळून आपल्या आईवडीलांकडे राहत होती. त्यांच्यात नेहमी वाद-विवाद होत होते. ही महिला नवी मुंबईत स्टेट बँकेत कामला आहे तर विजय हा एका खासगी कंपनीत कामाला आहे. गेल्या आठवड्यात मानखुर्द परिसरात सकाळी, विजय याने रागाच्या भरात आपल्या पत्नीवर चाकूने हल्ला केला. हल्ला झाला त्यावेळी अनेक लोक तेथे उपस्थित होते पण कोणीही या महिलेला मदत केली नाही.

घटनेची माहिती मिळताच मानखुर्द पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि तिला सायन येथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्या महिलेने माहिती दिल्यावरून आरोपी विजय याचा शोध सुरू केला. विजय हा गोवंडी स्टेशनवर असल्याची माहिती पोलिसांना मिळताचं, त्यांनी तेथे जाऊन विजयला अटक केली. दोघांचे पटत नव्हते, पत्नीवरील संशयामुळे हा हल्ला केल्याची कबुली आरोपीने दिली. अशी माहिती पोलीस आयुक्त शहाजी उमाप यांनी दिली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number