Gas Shortage: हॉटेल व्यावसायिकांना ‘महागाई’चा दुहेरी फटका; गॅस मिळत नसल्याने छत्रपती संभाजीनगरमध्ये लाकडाच्या दरात दुप्पट वाढ

छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅसचा पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे नागरिक आता पर्यायी इंधनाकडे वळले असून, परिणामी लाकडांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे.

Gas Shortage: हॉटेल व्यावसायिकांना ‘महागाई’चा दुहेरी फटका; गॅस मिळत नसल्याने छत्रपती संभाजीनगरमध्ये लाकडाच्या दरात दुप्पट वाढ

Gas Shortage: आखाती देशांमधील युद्ध आणि विस्कळीत पुरवठ्यामुळे निर्माण झालेल्या गॅस टंचाईचे चटके आता थेट सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅसचा पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे नागरिक आता पर्यायी इंधनाकडे वळले असून, परिणामी लाकडांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. या वाढत्या मागणीमुळे लाकडाच्या किमतीतही भरघोस वाढ झाली असून सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.

लाकूड दरात दुप्पट वाढ; व्यावसायिकांवर बोजा
काही दिवसांपूर्वीपर्यंत 4 ते 5 रुपये किलो दराने मिळणारे लाकूड आता थेट 8 रुपये किलोवर पोहोचले आहे. गॅस सिलिंडर वेळेवर उपलब्ध होत नसल्याने अनेक गृहिणी आणि हॉटेल व्यावसायिकांनी पुन्हा एकदा चुलीचा आधार घेतला आहे. मात्र, लाकडाचे दर वाढल्यामुळे हॉटेल व्यावसायिक आणि छोटे खानावळ चालवणाऱ्यांवर अतिरिक्त खर्चाचा मोठा भार पडत आहे. जर गॅसचा पुरवठा लवकर पूर्ववत झाला नाही, तर हे दर आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा – MNS On Gas Shortage : गॅस तुटवड्याविरोधात मनसेचे अनोखं आंदोलन; नाल्यातून काढला गॅस अन्…

हॉटेल आणि खानावळींसमोर ‘चुली’शिवाय पर्याय नाही
शहरातील मोठे हॉटेल आणि ढाबे यांना गॅसचा नियमित पुरवठा न झाल्यास त्यांना मोठ्या प्रमाणावर चुली सुरू कराव्या लागणार आहेत. यामुळे लाकडाची ‘डिमांड’ आगामी काळात प्रचंड वाढण्याची शक्यता आहे. इंधनाचा तुटवडा आणि महागाई या दुहेरी संकटामुळे नागरिक त्रस्त झाले असून, गॅस वितरणाने आपली यंत्रणा सुरळीत करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number