जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
राज्यातील सर्व हॉटेलांमधील खाद्यपदार्थांवर सरसकट पाच टक्के जीएसटी आकारण्याचा निर्णय झालाय. नवीन दरपत्रक 15 नोव्हेंबरपासून लागू होणार आहे.
जे हॉटेलमालक ग्राहकांकडून जास्त पैसे उकळतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मंगळवारी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना दिलीय.
हॉटेलमधील दरपत्रक नवीन दरांच्या उल्लेखासह ग्राहकांना द्यावे लागणार आहे. जे हॉटेलचालक या नियमांचे उल्लंघन करतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे, असे बापट यांनी सांगितलंय. केंद्र सरकारने जीएसटीची नवीन कररचना केलीय.
हॉटेलमधील जीएसटीबाबत सरकारने घेतलेला निर्णय
हॉटेलात जीएसटी 18 टक्क्यांहून 5 टक्क्यांवर
आजपासून हॉटेल दर पत्रकात बदल करणं आवश्यक
हॉटेल मालक दर कमी करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई
तक्रार आणि अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1800225900