Palghar Crime: भयंकर! पालघरमध्ये औषध देण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाने अल्पवयीन मुलीला जंगलात नेऊन केलं नको ते कृत्य

बहिणीच्या आजारपणावर उपचार करण्याच्या नावाखाली एका 55 वर्षीय भोंदू बाबाने अल्पवयीन मुलीला जंगलात नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे.

Palghar Crime: भयंकर! पालघरमध्ये औषध देण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाने अल्पवयीन मुलीला जंगलात नेऊन केलं नको ते कृत्य

Palghar Crime: नसरापूर प्रकरण ताजे असताना पालघर जिल्ह्यातील कासा परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. बहिणीच्या आजारपणावर उपचार करण्याच्या नावाखाली एका 55 वर्षीय भोंदू बाबाने अल्पवयीन मुलीला जंगलात नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला असून अंधश्रद्धेचे भयानक स्वरूप पुन्हा एकदा समोर आले आहे.

नेमकी घटना काय?
पीडित मुलीच्या बहिणीला गावठी औषध हवे असल्याने नातेवाईकांनी शिवराम परश सावर या भोंदू बाबाशी संपर्क साधला होता. औषध देण्याच्या बहाण्याने आरोपीने 4 मे रोजी रात्री 1 च्या सुमारास पीडितेला चरी पावण येथील एका निर्जन जंगलात नेले. तिथे तिच्यावर अत्याचार करून ही बाब कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

पोलीस कारवाई आणि अटक
पीडितेने धाडस दाखवून कुटुंबाला सर्व हकीकत सांगितल्यानंतर पालकांनी तत्काळ कासा पोलीस ठाणे गाठले. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी चक्रे फिरवली आणि 5 मे रोजी पहाटे 4 वाजता आरोपी शिवराम सावर याला त्याच्या घरातून बेड्या ठोकल्या. पीडित मुलगी सध्या रुग्णालयात उपचार घेत असून, जव्हार उपविभागीय पोलीस अधिकारी समीर मेहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

भोंदूगिरीच्या प्रकरणात वाढ 
दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसांपासून भोंदूबाबांकडून महिलांचे शोषण आणि फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. नाशिकच्या घटनेनंतर आता पालघरमधील या प्रकरणाने खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर, ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ने (अंनिस) जादूटोणा विरोधी कायदा अधिक कठोरपणे राबवण्याची मागणी केली आहे. ग्रामीण भागात पसरलेली अंधश्रद्धेची पाळेमुळे उखडून टाकण्याचे मोठे आव्हान आता प्रशासनासमोर आहे.

हेही वाचा – Narasapur Case: नसरापूर घटनेनंतर सरकारचा मोठा निर्णय! लैंगिक गुन्हेगारांना पॅरोल नाही; फडणवीसांचा कायद्यात बदलाचा इशारा

रोहित पवार घेणार पीडितेची भेट
या प्रकरणाची राजकीय वर्तुळातही दखल घेतली गेली आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे स्वतः पालघरमध्ये जाऊन पीडित कुटुंबाची भेट घेणार आहेत. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील भुसारा यांनी या दौऱ्याबाबत माहिती दिली असून, पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number