Dog Attack: पिटबुलचा 6 महिन्यांच्या बाळावर प्राणघातक हल्ला, तर दुसऱ्या घटनेत भटक्या कुत्र्याने 2 वर्षांच्या चिमुरडीला घरातून ओढत नेऊन…

एका घटनेत पिटबुलने तान्ह्या बाळावर हल्ला करत त्याला गंभीररीत्या जखमी केले. ही घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली. तर, दुसऱ्या घटनेत 2 वर्षांच्या चिमुरडीला कुत्र्यांनी घरातून ओढून नेऊन गंभीर चावे घेतले.

Dog Attack: पिटबुलचा 6 महिन्यांच्या बाळावर प्राणघातक हल्ला, तर दुसऱ्या घटनेत भटक्या कुत्र्याने 2 वर्षांच्या चिमुरडीला घरातून ओढत नेऊन…

Haryana Sonipat Pitbull Infant Attack: एका पिटबुल जातीच्या कुत्र्याने 6 महिन्यांच्या चिमुकल्यावर हल्ला करत त्याला अत्यंत गंभीररीत्या जखमी केले. ही दुर्दैवी घटना घडली तेव्हा चिमुरड्याची मावशी त्याला गल्लीतून घेऊन जात होती. अचानक धावत आलेल्या पिटबुलने थेट बाळावर झेप घेऊन त्याला पकडले. मावशीने मोठ्या धैर्याने बाळाची सुटका करण्याचा प्रयत्न केला, परंतु हिंस्त्र झालेल्या पिटबुलने तिच्यावरही हल्ला चढवला. हरियाणामधील सोनीपत येथील सिक्का कॉलनी परिसरात ही घटना घडली.

हल्ल्याचे थरारक दृश्य सीसीटीव्हीत कैद; बाळ रोहतक पीजीआयमध्ये उपचारधीन
सदर धक्कादायक घटनेचे सर्व दृश्य जवळच असलेल्या एका सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाले असून, त्यात पिटबुल वारंवार बाळावर हल्ला करताना दिसत आहे. या प्राणघातक हल्ल्यात 6 महिन्यांचे बाळ अत्यंत गंभीर जखमी झाले असून, सुरुवातीला त्याला स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी रोहतक सरकारी रुग्णालयात (पीजीआय) हलवण्यात आले. सध्या या चिमुकल्यावर रोहतक येथे तातडीचे वैद्यकीय उपचार सुरू आहेत.   

रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आणि कुत्र्याच्या मालकाच्या बेफिकीरीवर प्रश्नचिन्ह
या घटनेनंतर सिक्का कॉलनीतील नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. दाट लोकवस्तीच्या भागात पिटबुलसारख्या धोकादायक प्रजातीच्या कुत्र्याला ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या सुरक्षा नियमांचे पालन केले जात होते की नाही, असा सवाल रहिवाशांनी उपस्थित केला आहे. कुत्र्याच्या मालकाच्या हलगर्जीपणामुळेच ही घटना घडल्याचे म्हटले जात असले तरी पीडित कुटुंबाने अद्याप पोलिसांत कोणतीही औपचारिक तक्रार दाखल केलेली नाही.

हेही वाचा – Crime News: अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; शेतात छिन्नविछिन्न अवस्थेत फेकलेल्या मृतदेहाचे कुत्र्यांनी तोडले लचके

महाराष्ट्रातील जालन्यात घरात घुसून 2 वर्षांच्या चिमुरडीला भटक्या कुत्र्याने केले जखमी
दुसरीकडे, महाराष्ट्रातील जालन्यामधील गीतांजली कॉलनीतील नॅशनल नगर भागात एका 2 वर्षांच्या मुलीवर भटक्या कुत्र्याने हल्ला केला. ही चिमुरडी आपल्या घरात असताना एका भटक्या कुत्र्याने आत शिरून तिला थेट घराबाहेर ओढून आणले आणि तिच्या गालाचा जोरदार चावा घेतला. या हल्ल्यात चिमुरडीच्या गालाला गंभीर दुखापत झाली असून, स्थानिक नागरिकांनी तिला तातडीने जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.   

लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पालिका प्रशासनाविरोधात संताप
देशात सलग घडलेल्या या दोन्ही घटनांमुळे लहान मुलांच्या सुरक्षेचा आणि जबाबदारीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. जालन्यातील वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या संख्येमुळे नागरिक त्रस्त झाले असून, लहान मुलांच्या सुरक्षेसाठी नगरपालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात आणि या समस्येचा बंदोबस्त करावा, अशी तीव्र मागणी स्थानिक रहिवाशांकडून केली जात आहे.

हेही वाचा – Solapur Crime : सासरच्या जाचाला कंटाळून करमाळ्यातील सूनेनं पुण्यात घेतला गळफास; पतीला अटक, तर इतर 4 जणांवर गुन्हा दाखल

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number