गुणरत्न सदावर्तेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

एसटी कर्मचाऱ्यांचे वकील ऍड. गुणरत्न सदावर्ते यांना आज गिरगाव न्यायायात हजर करण्यात आले. दरम्यान, गिरगाव न्यायालयाने सिल्वर ओक आंदोलन प्रकरणी निकाल दिला आहे. गुणरत्न सदावर्ते यांना गिरगाव न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी आंदोलन केल्याप्रकरणी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील ऍड. गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत आणखी वाढ […]

गुणरत्न सदावर्तेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

एसटी कर्मचाऱ्यांचे वकील ऍड. गुणरत्न सदावर्ते यांना आज गिरगाव न्यायायात हजर करण्यात आले. दरम्यान, गिरगाव न्यायालयाने सिल्वर ओक आंदोलन प्रकरणी निकाल दिला आहे. गुणरत्न सदावर्ते यांना गिरगाव न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी आंदोलन केल्याप्रकरणी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील ऍड. गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. सदावर्तेंना आजही दिलासा मिळालेला नाही. याप्रकरणी गिरगाव न्यायालयात सुनावणी पार पडली असून न्यायलयाने सदावर्तेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

सदावर्तेंवर सोलापुरात गुन्हा दाखल

ऍड. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात सोलापुरात गुन्हा दाखल झाला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत दिलेल्या निकालाचे अनुषंगाने न्यायालयाच्या निकालाविरुद्ध नापसंती दर्शवत निर्णयावर शंका घेत, न्यायाधीशांविषयी अवमानकारक भाषा वापरल्या प्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात सोलापुरातील चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

कोल्हापूर पोलिसांकडे सदावर्तेंचा ताबा?

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात कोल्हापूर येथील शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाला विरोध करून मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तसेच मराठा आणि मागासवर्गीय समाज यांच्यात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सदावर्तेंनी केला असल्याची तक्रार दिलीप पाटील यांनी केली आहे. त्यामुळे आता गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा कोल्हापूर पोलिसांकडे जाणार का, यावर सुनावणी पार पडणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number