Gunaratna Sadavarte : "महाराजांच्या बाजूला फोटो पाहून राग का येत नाही?" बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंची पुन्हा जीभ घसरली; राजकीय वर्तुळात खळबळ

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोवरुन वाद निर्माण झालेला आहे.  गुणरत्न सदावर्ते यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्यावर लावण्यात आलेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्य

Gunaratna Sadavarte : &quotमहाराजांच्या बाजूला फोटो पाहून राग का येत नाही?&quot बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंची पुन्हा जीभ घसरली; राजकीय वर्तुळात खळबळ

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोवरुन वाद निर्माण झालेला आहे.  गुणरत्न सदावर्ते यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्यावर लावण्यात आलेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोवर एक आक्षेप घेतलेला आहे. हा फोटो फक्त 15 दिवसांच्या आत काढण्यात यावा, अशी मागणी त्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याकडे केलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांनी मान राखला पाहिजे, त्यामुळेच त्यांच्या पुतळ्याच्या वर असलेला बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लवकर काढण्यात यावा, असे  गुणरत्न सदावर्ते यांनी थेट म्हटले आहे शिवाय हा फोटो लवकर काढला नाही, तर आंदोलन आणि उपोषणही करण्याचा इशारा  गुणरत्न सदावर्तेंनी दिला आहे.

हेही वाचा- Gunaratna Sadavarte On Eknath Shine: “एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाही” सदावर्तेंचा मोठा दावा; राजकीय वातावरण तापलं

दुसरीकडे महाराष्ट्रातील अनेक भागांतून मराठा युवक आपल्याशी वारंवार संपर्क साधत आहे, असा दावा  गुणरत्न सदावर्ते यांनी केलाय. डोंबिवली आणि मुंबईतील युवकांचाही यात समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्यावरी काही प्रश्न उपस्थित केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या वर बाळासाहेर ठाकरे यांचा फोटो लावण्यात आल्याने त्यांचा मान कमी होत असल्याचे वाटत असेल, तर राज ठाकरे यांना याबाबतचा राग का येत नाही, असाही प्रश्न त्यांची केला. तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकेर यांच्यासह पत्रकारितेतून युट्युबकडे वळलेल्या काही व्यक्तींवरही सदावर्ते यांनी टीका केलेली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number