बी आर चोप्रांच्या गाजलेल्या ‘महाभारत’ या मालिकेत शकुनी मामा ही भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते गुफी पेंटल यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण आता त्यांची प्रकृती स्थिर असलयाचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे. गूफी पेंटल यांना किडनी आणि हृदयाचा त्रास असल्याने त्यांना मुंबईतील बेलेव्ह्यू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मात्र आता त्यांच्या […]
बी आर चोप्रांच्या गाजलेल्या ‘महाभारत’ या मालिकेत शकुनी मामा ही भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते गुफी पेंटल यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण आता त्यांची प्रकृती स्थिर असलयाचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे. गूफी पेंटल यांना किडनी आणि हृदयाचा त्रास असल्याने त्यांना मुंबईतील बेलेव्ह्यू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मात्र आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहेत.