GT vs CSK, IPL 2026 हायलाइट्स: इंडियन प्रीमियर लीग 2026 चा 66 वा सामना गुरुवारी (21 मे) अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात खेळला गेला. गुजरातने चेन्नईचा ८९ धावांनी एकतर्फी पराभव केला. फलंदाजी केल्यानंतर गुजरातने उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शनही केले.
प्रथम फलंदाजी करताना गुजरातने २२९/४ धावा केल्या. प्रत्युत्तरात, चेन्नईचा संघ १३.४ षटकांत १४० धावांवर सर्वबाद झाला. या पराभवाने चेन्नईचे प्लेऑफमध्ये पोहोचण्याचे स्वप्न भंगले. प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी त्यांना हा सामना जिंकणे आवश्यक होते, परंतु ते त्यात अपयशी ठरले. या विजयामुळे गुजरातचे आता १४ सामन्यांतून १८ गुण झाले असून, ते गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचले आहेत.
धावांचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्सची सुरुवात खराब झाली आणि त्यांनी झटपट तीन विकेट गमावल्या: संजू सॅमसन (०), ऋतुराज गायकवाड (१६) आणि उर्विल पटेल (०). या तिघांनाही मोहम्मद सिराजने बाद केले. त्यानंतर सावधपणे खेळत असलेला मॅथ्यू शॉर्ट (२४) कागिसो रबाडाच्या गोलंदाजीवर बाद झाला.
नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध २२९/४ अशी मोठी धावसंख्या उभारली. साई सुदर्शनने ८४ आणि शुभमन गिलने स्फोटक ६४ धावा केल्या. जोस बटलरनेही २७ चेंडूंमध्ये नाबाद ५७ धावा करत सीएसकेच्या गोलंदाजांना झोडपले. या सामन्यामध्ये लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी एक मजबूत सुरूवात करण्याची गरज होती. मात्र मोहम्मद सिराज याने सीएसकेच्या मिडल ऑर्डरमधील तीन फलंदाजांना आऊट केले. नंतर त्याने संजू सॅमसन याला पहिल्याच बॉलवर माघारी धाडले.