Accident Due to Google Map: गुगल मॅप्सचा ‘तो’ शॉर्टकट ठरला मृत्यूचा सापळा; कार थेट 4 फूट खोल नाल्यात, 5 जणांचा…

तुम्हीही अनोळखी मार्गांवर प्रवास करताना 'गुगल मॅप्स'वर (Google Maps) आंधळा विश्वास ठेवत असाल, तर हापूरमधील ही धक्कादायक घटना नक्की वाचा.

Accident Due to Google Map: गुगल मॅप्सचा ‘तो’ शॉर्टकट ठरला मृत्यूचा सापळा; कार थेट 4 फूट खोल नाल्यात, 5 जणांचा…

Accident Due to Google Map: विज्ञानामुळे प्रगती झाली असून तंत्रज्ञानामुळे प्रवास सोपा झाला आहे; पण हेच तंत्रज्ञान कधीकधी तुम्हाला मृत्यूच्या दारात नेऊन उभे करू शकते. तुम्हीही अनोळखी मार्गांवर प्रवास करताना 'गुगल मॅप्स'वर (Google Maps) आंधळा विश्वास ठेवत असाल, तर हापूरमधील ही धक्कादायक घटना नक्की वाचा. येथे 'गुगल मॅप्स'मुळे एका संपूर्ण कुटुंबाला तब्बल दोन तास मृत्यूशी झुंज द्यावी लागली. मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद ईशान हे आपल्या कुटुंबासह गौतम बुद्ध नगरमधील दादरी (सादिकपुरा) येथून मेरठमधील किठौर येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी कारने निघाले होते. या प्रवासात त्यांच्यासोबत गुड्डी नावाची महिला, सादिक नावाचा तरुण आणि रेशू व ताहिर ही दोन लहान मुले होती. रात्रीच्या सुमारास हापूर जिल्ह्यातील मेरठ उड्डाणपुलाजवळ कार पोहोचली असता तिथे मोठी वाहतूक कोंडी झाली होती. रस्ता अनोळखी असल्याने कोंडीतून मार्ग काढण्यासाठी चालकाने मोबाईलवर गुगल मॅप्स सुरू केले. मॅपने सुचवलेल्या पर्यायी मार्गाने कार पुढे निघाली, मात्र हाच मार्ग पुढे अत्यंत धोकादायक ठरला.

कारचे सेंट्रल लॉकिंग झाले जाम 
हापूरच्या प्रीत विहार परिसरातून जात असताना गुगल मॅपने दाखवलेला रस्ता अचानक संपला आणि कार थेट 4 फूट खोल असलेल्या एका मोठ्या नाल्यात कोसळली. कार नाल्यात पडताच झालेल्या मोठ्या धडकेमुळे वाहनाची 'सेंट्रल लॉकिंग' यंत्रणा अचानक जाम झाली. यामुळे महिला आणि लहान मुलांसह पाचही जण कारच्या आतच अडकले. कारमधील हवा झपाट्याने कमी होत असल्याने सर्वांचा श्वास गुदमरू लागला. ईशान आणि सादिक यांनी कारच्या काचा फोडण्याचा आटोकाट प्रयत्न केला, परंतु त्यांना यश आले नाही. अखेर चालकाने प्रसंगावधान राखून तातडीने 112 या आपत्कालीन क्रमांकावर फोन करून पोलिसांना घटनेची माहिती दिली.

अग्निशमन दल आणि पोलिसांचे 2 तास बचावकार्य; स्थानिक नागरिकांची फलक लावण्याची मागणी
घटनेची माहिती मिळताच हापूर पोलीस आणि अग्निशमन दलाची पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. चिखल आणि पाण्याचा दाब यामुळे बचावकार्यात मोठ्या अडचणी येत होत्या. अखेर तब्बल 2 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर जवानांनी कारची खिडकी कापून आत अडकलेल्या पाचही जणांना सुखरूप बाहेर काढले. सुदैवाने या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही.

हेही वाचा – Goa Dudhsagar Drowning : काळजाचा थरकाप! गोव्यातील दूधसागर नदीत 3 सख्ख्या भावांसह 4 विद्यार्थ्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू

या घटनेनंतर संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी या धोकादायक नाल्याजवळ तातडीने दिशादर्शक आणि धोक्याची चेतावणी देणारा फलक लावण्याची मागणी केली आहे. तंत्रज्ञान हे केवळ आपल्या मार्गदर्शनासाठी असून ते शंभर टक्के अचूक असू शकत नाही, त्यामुळे अनोळखी आणि रात्रीच्या प्रवासात केवळ स्क्रीनवर विसंबून न राहता स्थानिक लोकांकडून रस्त्याची खात्री करून घेणे किती गरजेचे आहे, हाच धडा या घटनेने दिला आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number